राज्यात आतापर्यंत १ कोटी ११ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:06 AM2021-04-16T04:06:12+5:302021-04-16T04:06:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बुधवारी ३ हजार ९८६ व्या लसीकरण सत्रात ३ लाख ५७ हजार १२३ जणांचे ...

More than 1 crore 11 lakh people have been vaccinated in the state so far | राज्यात आतापर्यंत १ कोटी ११ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

राज्यात आतापर्यंत १ कोटी ११ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बुधवारी ३ हजार ९८६ व्या लसीकरण सत्रात ३ लाख ५७ हजार १२३ जणांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत एकूण १ कोटी ११ लाख ३३ हजार ६१८ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आऱोग्य विभागाने दिली.

राज्यात आतापर्यंत १० लाख ५३ हजार ११९ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर ५ लाख २१ हजार ३२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. ९ लाख ७२ हजार ८६२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ३ लाख ३३ हजार १६३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. ४५ हून अधिक वय असणाऱ्या ८ लाख २१ हजार १४१ लाभार्थ्यांना पहिला तर २ लाख ३२ हजार ३०१ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

मुंबईत आतापर्यंत १८ लाख २० हजार ९७० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत बुधवारी ४३ हजार २३४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील ३५ हजार ९२१ लाभार्थ्यांना पहिला तर ७ हजार ३१३ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण १७ लाख ९६ हजार ६८६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

याखेरीज, पुण्यात १५ लाख ७७ हजार ५३४, ठाण्यात ८ लाख ७ हजार २७८, नागपूरमध्ये ७ लाख ४९ हजार ९५२, नाशिकमध्ये ४ लाख ८६ हजार ७९१ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

Web Title: More than 1 crore 11 lakh people have been vaccinated in the state so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.