लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शनिवारी २ लाख १७ हजार २४४ जणांचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ४२ लाख ३० हजार ६०५ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
राज्यात आतापर्यंत एकूण १६ लाख ६७ हजार ७३५ आरोग्य कर्मचाऱ्यांना, १६ लाख ४४ हजार ८५८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना, ४५ ते ५९ वयोगटातील ५१ लाख ४ हजार २०१ लाभार्थ्यांना आणि साठहून अधिक वय असणाऱ्या ५८ लाख १३ हजार ८११ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर मुंबईत आतापर्यंत २२ लाख ५७ हजार ११८ जणांचे, पुण्यात २० लाख ५७ हजार ५७, ठाण्यात १० लाख ९२ हजार ६४०, नागपूरमध्ये ८ लाख ८८ हजार १४१ आणि नाशिकमध्ये ६ लाख ३७ हजार ३८४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
..................