जिल्ह्यात १ लाखाहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:08 PM2020-08-25T16:08:59+5:302020-08-25T16:10:09+5:30

ठाणे जिल्ह्यासाठी समाधानाची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ६२४ कोरोना बाधीत रुग्णांपैकी तब्बल १ लाख ६१ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर जिल्ह्यात आता हळू हळू का होईना कोरोना बाधीत रुग्णांची संख्याही घटत असल्याने ही दिलासादायक बाब ठरत आहे.

More than 1 lakh patients in the district have overcome corona | जिल्ह्यात १ लाखाहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात

जिल्ह्यात १ लाखाहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात

Next

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातही हळू हळू कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सोमवार पर्यंत तब्बल १ लाख ६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून जिल्ह्यासाठी ही समाधानाची आणि दिलासादायक बाब ठरली आहे. तर १ लाख १५ हजार ६२४ रुग्णांपैकी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही १२ हजार २६२ एवढी आहे. तर आतापर्यंत ३३०१ जणांना कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यु झाला आहे.
                मार्च पासून कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर मे पासून कोरोनाचा फैलाव जिल्ह्याच्या विविध महापालिकांच्या ठिकाणी होतांना दिसून आला. जून आणि जुलै मध्ये रुग्णांची संख्या वाढतांना दिसत होती. त्यामुळे रुग्णांना हॉस्पीटलमध्ये बेडही मिळणे मुश्किल होऊन बसले होते. परंतु जुलै मध्यानंतर आणि आॅगस्ट महिना उजाडला आणि कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही दिवसागणिक कमी होऊ लागल्याचे दिसून आले. विविध महापालिकांनी केलेल्या उपाय योजना, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, आया आदींसह पोलीस यंत्रणा व इतर शासकीय यंत्रणा तसेच राजकीय मंडळींनी घेतलेली काळजी, नागरीकांप्रती केलेली जनजागृती यामुळेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात ठाणे जिल्ह्याला बºयाच प्रमाणात यश आले आहे. जुलै पर्यंत प्रती दिन जिल्ह्यात १५०० ते २००० पर्यंत कोरोना बाधीत रुग्ण आढळत होते. परंतु आॅगस्ट महिन्यात हीच संख्या आता खाली आली आहे. सोमवारी जिल्ह्यात ८५९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी निश्चितच ही चांगली बाब म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात मिळविलेल्या या यशाचे कौतुक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुध्दा केले आहे. कल्याण डोंबिवलीत वाढणारी रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार येत्या महिन्याभरात येथील संख्याही आटोक्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.
एकूणच विविध स्वरुपाच्या केलेल्या उपाय योजनांमुळे ठाणे जिल्ह्यात विविध महापालिकांच्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांची संख्या घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आजच्या घडीला जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ६२४ रुग्णांपैकी १ लाख ६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर प्रत्यक्ष उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ही १२ हजार २६२ एवढी आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात ३३०१ रुग्णांची कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आता मृतदर रोखण्यासाठी देखील महापालिका स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहे. ठाण्यात एका कोवीड सेंटर रुग्णालयापोठापाठ आता कळवा, मुंब्य्रातही १ हजार बेडची कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे.

ठाणे महापालिका हद्दीतही खासकरुन झोपडपटटी भागातील कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या रोखण्यात महापालिका प्रशासन यशस्वी झाले आहे. मुंब्रा पॅर्टन तर यशस्वी झाला आहे. त्या पोठापोठ आता वागळे इस्टेट भागातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही आटोक्यात आली असून सोमवारी या भागात केवळ १ नवा कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तर लोकमान्य नगर भागातही १०, मुंब्रा ३, दिवा ८, उथळसर १४ असे रुग्ण आढळले आहेत. मात्र माजिवडा - मानपाडा, नौपाडा आणि कळव्यातही पहिल्यापेक्षा कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
 

Web Title: More than 1 lakh patients in the district have overcome corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.