Join us

CoronaVirus News: राज्यात चार महिन्यांत तब्बल १२ हजारांहून अधिक बळी; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:34 AM

आतापर्यंत सात लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.

मुंबई : राज्यात मागील चार महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचे तब्बल १२ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यंत १ लाख ७५ हजार २९ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत, तर दिवसभरात ५ हजार ४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत सात लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.

राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू असून सोमवारी ८ हजार २४० रुग्ण, तर १७६ मृत्यूंची नोंद झाली. कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १८ हजार ६९५ झाली असून मृतांचा आकडा १२ हजार ३० झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७७ आहे. दिवसभरात नोंद झालेल्या १७६ मृत्यूंमध्ये मुंबई ४१, ठाणे ५, नवी मुंबई मनपा ११, कल्याण-डोंबिवली मनपा ११, उल्हासनगर मनपा ६, वसई-विरार मनपा २, रायगड ४, पनवेल मनपा २, नाशिक मनपा २, धुळे मनपा १, जळगाव १८, जळगाव मनपा ३, पुणे ९, पुणे मनपा २२, पिंपरी-चिंचवड मनपा ११, सोलापूर १, सोलापूर मनपा ४, सातारा २, कोल्हापूर ४, सांगली ४, औरंगाबाद मनपा ३, जालना १, लातूर १, नांदेड मनपा १, अमरावती १, अमरावती मनपा १, बुलडाणा २, वाशिम १, वर्धा १ आणि अन्य राज्य/ देशातील १ इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई