राज्यात एक कोटी २२ लाखांहून अधिक जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:06 AM2021-04-20T04:06:56+5:302021-04-20T04:06:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात रविवारी एक लाख २७ हजार ७९ जणांना काेराेना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली, तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात रविवारी एक लाख २७ हजार ७९ जणांना काेराेना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण एक कोटी २२ लाख ८३ हजार ५० जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
राज्यात मुंबईत १९ लाख ९६ हजार ९०६, पुण्यात १७ लाख ५३ हजार ६१०, ठाण्यात नऊ लाख १४ हजार ७३२, नागपूरमध्ये आठ लाख चार हजार ८०२, नाशिकमध्ये पाच लाख ४६ हजार १२३ लाभार्थींना लस देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत दोन लाख ६६ हजार १३१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे तर दोन लाख ९७ हजार २३२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहा लाख ४८ हजार ८१३ जणांना आणि ६०हून अधिक वयोगटातील सात लाख ५६ हजार ८९१ जणांना लस देण्यात आली.
...........................