Join us

एनसीबीच्या कारवाईत १५ हून अधिक जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि नवी मुंबईमध्ये शुक्रवारी चार ठिकाणी छापे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि नवी मुंबईमध्ये शुक्रवारी चार ठिकाणी छापे टाकून १५ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. यात ३ नायजेरियन ड्रग्ज तस्करांचा समावेश आहे. एनसीबीने या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळते आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कारवाई सुरू होती.

एनसीबीने गेल्या आठवड्यात हार्बर लाइनवरील मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या तस्करांवर कारवाई करत, हेरॉईन, कोकेन आणि एमडी असे १ कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. कारवाईच्या वेळी ड्रग्ज तस्करांनी केलेल्या हल्ल्यात एनसीबीच्या पथकातील पाच कर्मचारी जखमी झाले होते. एनसीबीने नायजेरियन ड्रग्ज तस्कर ओबिओरा एक्वेलार याला अटक करून पसार झालेल्या आणखी चार तस्करांचा शोध सुरू केला होता. त्यानुसार, एनसीबीने मुंबई आणि नवी मुंबईमध्ये चार ठिकाणी कारवाई केल्याची माहिती मिळते आहे.

शुक्रवारी सकाळपासून एनसीबीची कारवाई सुरू आहे. यात आतापर्यंत १५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कारवाई सुरू होती.