आयटीआयच्या दीड लाख जागांसाठी २ लाखांहून अधिक अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:39 AM2020-08-19T04:39:13+5:302020-08-19T04:39:18+5:30

जिल्हा स्तरावर ७० टक्के आणि राज्य स्तरावर ३० टक्के प्रवेश असा मोठा बदल आयटीआय प्रवेशाच्या नियमांमध्ये केला आहे.

More than 2 lakh applications for 1.5 lakh ITI seats | आयटीआयच्या दीड लाख जागांसाठी २ लाखांहून अधिक अर्ज

आयटीआयच्या दीड लाख जागांसाठी २ लाखांहून अधिक अर्ज

Next

मुंबई : राज्यात आयटीआय प्रवेशाच्या अर्जनोंदणीसाठी २१ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे मात्र इथे १७ दिवसांतच तब्ब्ल २ लाख ४८ हजार ९९ विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी केली आहे. यंदा आयटीआयच्या प्रवेशासाठी १ लाख ४५ हजार ८२८ जागा उपलब्ध असताना अजार्ची संख्या मात्र दुप्पटीकडे झेपावत आहे. यामुळे साहजिकच आयटीआय प्रवेशासाठी मोठी चुरस असणार आहे हे स्पष्ट होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उशिरा लागलेल्या निकालामुळे आयटीआय प्रवेशप्रक्रिया ही उशिरा सुरु झाली असली तरी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद अर्जनोंदणीसाठी मिळत आहे. मंगळवारी रात्री हाती आलेल्या माहितीनुसार २ लाख १४ हजार ९ विद्यार्थ्यांनी प्रवेशशुल्क भरून अर्जनोंदणी केली आहे. आयटीआयच्या प्रवेश क्षमतांचा पूर्ण वापर व्हावा आणि १०० टक्के प्रशिक्षणाच्या जागा भरल्या जाव्यात यासाठी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआयच्या नियमावलीत शासनाकडून बदल करण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर ७० टक्के आणि राज्य स्तरावर ३० टक्के प्रवेश असा मोठा बदल आयटीआय प्रवेशाच्या नियमांमध्ये केला आहे.
राज्यातील ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे.
याचबरोबर राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे. अर्जनाच्या संख्येवरुन यंदा मुंबईतून सगळ्यात कमी प्रतिसाद आयटीआयला मिळत आहे तर सर्वाधिक प्रतिसाद हा औरंगाबाद विभागातून मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा यंदाचा कल आयटीआयकडे अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.
>विभाग एकूण अर्ज नोंदणी
मुंबई २३८५०
पुणे ३५९७९
नाशिक ३८१२५
नागपूर ३२३७३
औरंगाबाद ४५२६३
अमरावती ३८१२५

Web Title: More than 2 lakh applications for 1.5 lakh ITI seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.