आतापर्यंत १८ लाख ३४ हजार ९३५ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात २ हजारांहून अधिक रुग्ण काेराेनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात काेराेनाचे २ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १८ लाख ३४ हजार ९३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के झाले आहे, तर मृत्युदर २.५६ टक्के आहे. सध्या राज्यात ५३ हजार १३७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात दिवसभरात ३ हजार २१८ रुग्णांचे निदान झाले असून ५१ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ३८ हजार ८५४ झाली असून बळींचा आकडा ४९ हजार ६३१ झाला आहे. शनिवारी नोंद झालेल्या ५१ मृत्यूंपैकी २४ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहे. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.
या ५१ मृत्यूंमध्ये मुंबई ७, ठाणे २, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा १, रायगड ७, पनवेल मनपा १, नाशिक २, नाशिक मनपा ३, अहमदनगर २, जळगाव २, सोलापूर १, सातारा १, जालना २, उस्मानाबाद १, बीड २, अकोला मनपा २, बुलडाणा २, नागपूर १, नागपूर मनपा २, वर्धा २, गोंदिया ६, चंद्रपूर १ या रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २८ लाख ९० हजार ४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात २ लाख ५८ हजार ६६८ व्यक्ती घरगुती, तर ३ हजार १५९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
...........................