‘२२ हून अधिक इस्लामिक देशांत तोंडी तलाकला बंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:39 PM2018-05-30T23:39:29+5:302018-05-30T23:39:29+5:30
जगात २२ हून अधिक इस्लामिक देशांत तोंडी तलाक प्रथेला कायदेशीर मनाई आहे.
मुंबई : जगात २२ हून अधिक इस्लामिक देशांत तोंडी तलाक प्रथेला कायदेशीर मनाई आहे. परंतु आपल्या देशातील जमातवादी मुस्लीम आणि अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळ या विषयावर समाजाची आणि मुस्लीम महिलांची दिशाभूल करीत आहेत. तेव्हा त्यांनी खरा इस्लाम समजून घ्यावा आणि मुस्लीम समाजाने स्वरचित कोशातून बाहेर पडावे, असे प्रतिपादन मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दिन तांबोळी यांनी केले.
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात हुंडाविरोधी चळवळीच्या ४५व्या वर्धापन दिनानिमित्ताने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता, त्या वेळी तांबोळी बोलत होते. या पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष होते.
गडचिरोली जिल्ह्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून क्रांती घडवणाऱ्या शुभदा देशमुख यांना ‘राधाबाई कुलकर्णी विधायक कार्यकर्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.