Join us

२३ लाखांहून अधिक मजूर गेले आपल्या मूळगावी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 7:28 PM

१ हजार ७७३ श्रमिक विशेष ट्रेनमधून मजुरांचा प्रवास 

 

मुंबई : लॉकडाउनमुळे विविध भागात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळगावी पोहचविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्यावतीने  १ मेपासून देशभरात श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात येत आहे. मागील २० दिवसात भारतीय रेल्वेने देशातल्या विविध राज्यांत एकूण १ हजार ७७३ विशेष श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात आले आहे. या श्रमिक विशेष  ट्रेनमधून तब्बल २३ लाख ५० हजारांपेक्षा जास्त मजूर आपापल्या राज्यातील मूळगावी पोहचले आहेत. 

कामगार दिनी म्हणजे  १ मे रोजीपासून ते २० मे पर्यंत  भारतीय रेल्वेने एकूण १ हजार ७७३ श्रमिक विशेष ट्रेन धावल्या आहेत. या ट्रेनमधून तब्बल २३.५ लाखांपेक्षा जास्त मजूर आपल्या मूळगावी पोहचले आहेत. सर्व मजुरांचे गाडीत चढण्यापूर्वी स्क्रिनिंग केले जात आहे. प्रवाशांना गाडीत मोफत जेवण आणि पाणी पुरवले जात आहे. या श्रमिक विशेष ट्रेन उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश, चंदिगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पुदूचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यांतून सोडण्यात आल्या. या श्रमिक विशेष ट्रेन आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तिसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, नागालँड, ओरिसा, राजस्थान, तामिळनाडू, तेलगंणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात परतल्या.  

---------------------------------------  

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील रेल्वेची प्रवासी वाहतुक २४ मार्चपासून पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीकरिता श्रमिक ट्रेन १ मे पासून चालविण्यात येत आहेत. मजुरांची संख्या पाहता आणि त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये याकरिता रेल्वे  मंत्रालयाने श्रमिक ट्रेनची संख्या सुद्धा वाढविण्यात आली आहे. बुधवारी  एका दिवसात म्हणजे  देशातल्या विविध राज्यांत एकूण २०५  गाड्या चालवून त्यातून २ लाख ५० हजार प्रवाशांना आपापल्या राज्यांत पोहोचवून एक विक्रम भारतीय रेल्वेने नोंदविला आहे. 

 

टॅग्स :रेल्वेकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस