दोन दिवसांत २३ हजारांहून अधिक वाहने जप्त; नाकाबंदी पोलिसांच्या जीवावर बेतण्याची भीती?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 04:57 AM2020-07-01T04:57:35+5:302020-07-01T06:48:42+5:30
दिवसभरात ३० हजार वाहनांची तपासणी : १३७ ठिकाणी नाकाबंदी, चाकरमान्यांचे हाल; पोलिसांशी हुज्जत
गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत विनाकारण घराबाहेर पडणाº्यांविरुद्ध कड़क कारवाईचे सत्र सुरु होते. मुंबईत सोमवारी वाहतूक आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३० हजारांहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे दोन दिवसांत तब्बल २३ हजारांहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे कुठे वाद तर कुठे मुंबईकरांनी धसका घेतलेला दिसून आला. यात अत्यावश्यक सेवा तसेच कामावर निघालेल्यांची मात्र कोंडी झालेली पहावायस मिळाली.
सोमवारी पहाटेपासूनच मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांसह संपूर्ण शहरात १३७ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत नियमित बंदोबस्ता बरोबरच दोन ते तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या १२ परिमंडळ तसेच पोर्ट झोनअंतर्गत सोमवारी ३० हजार ७२ वाहनांची तपासणी केली. यात ११ हजार ५७९ दुचाकी, १ हजार३६६ तीन चाकी तर ६ हजार ६४० चार चाकी वाहनांचा समावेश होता. त्यापैकी तब्बल ७ हजार ६८० वाहने जप्त करण्यात आली आहे. यात मोटार वाहन कायद्याअंतर्गत ६ हजार ८६० जणांवर कारवाई करण्यात आली. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ अंतर्गत ६४५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तर वाहतूक पोलिसांनी रविवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल ८ हजार ६११ वाहने जप्त केली. यात ६ हजार २४१ दुचाकींचा समावेश आहे.
यात दोन दिवसांत वाहतूक आणि मुंबई पोलिसांकड़ून करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल २३ हजारांहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात, यात पूर्व आणि उत्तर विभागातील कारवाईची आघाडी दुस?्या दिवशीही कायम होती. आनंद नगर टोलनाका, ऐरोली टोल नाका तसेच मुलुंड चेकनाका, दहिसर टोलनाका परिसरात पोलिसांच्या तपासणीमुळे लांबच लांब रांगा दिसून आल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद होताना दिसला. तर काहीनी या कारवाईचा धसका घेतलेला दिसून आला.
गाड्या सोडविण्यासाठी चालक येतात अंगावर! : ई-चलानचा पर्याय अवलंबिण्याची विनंती
‘साहेब, गाडी सोडा ना, तीन महिन्यांनंतर कामावर चाललोय,’ असे सांगत हातापाया पडणारे किंवा पोलीस ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर वेळेस वाद घालणाºया चालकांशी बाचाबाची होण्याचे प्रकार पोलिसांसोबत सतत घडत आहेत. परिणामी रस्त्यावर नाकाबंदी आणि वाहन तपासणी करणाºया पोलिसाला कोरोनाची लागण होऊन त्याच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात असून ई-चलानसारख्या पर्यायांचा अवलंब करण्याची विनंती आयुक्तांना करण्यात येत आहे.
त्याबाबत काही पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रिया खरेच विचार करण्यास भाग पडणाºया आहेत. विनाकारण फिरणाºया वाहनांवर ई-चलानमार्फत कारवाई करण्यात यावी. जेणेकरून लोक पोलिसांच्या संपर्कात येणार नाहीत. मेसेजमार्फत त्यांना दंडाची रक्कम कळेल आणि पोलीस ठाण्यात न येता ते थेट कोर्टात जातील. नाकाबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पोलीस एकमेकांच्या संपर्कात येतात. पोलिसांची संख्याही आता वाढणार असून येत्या आठवड्यात ती आकडेवारी सर्वांना समजेलच, अशीही भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ज्या गाड्या अडवल्या जातात, त्या आम्ही पोलीस ठाणे किंवा मोकळ्या रस्त्यांवर पार्क करतो. मात्र सध्या त्या गाड्यांवर बसून त्या पार्क करण्यासाठीही कर्मचारी धजावत नाहीत. आम्ही गाडीला हात लावणार नाही, असे उत्तर सरळ दिले जातेय.
...म्हणून दोन फटके द्यावे लागले!
‘सोमवारी कोविड टेस्ट करण्यासाठी जाणाºया पती-पत्नीला ताटकळत ठेवावे लागले. कारण त्यांच्या आधी डबलसीट फिरणाºया दोन गाड्या अडविण्यात आल्या होत्या. अखेर त्यांनी संबंधित मेसेज दाखवत अत्यावश्यक सेवेबाबत कल्पना आम्हाला दिली. म्हणून आम्ही त्यांना सोडून दिले, तेव्हा त्यांच्या आधी रोखलेल्या दोघांनी आमच्या अंगावर येत आमच्याशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली आणि इच्छा नसतानाही काठीचे दोन फटके आम्हाला त्यांना द्यावे लागले. एका बँक कर्मचारी महिलेसोबतही असेच झाले होते. पती आणि पत्नी दोघे बँकेत, पण वेगवेगळ्या ब्रँचमध्ये काम करत होते. त्यामुळे बायकोला आॅफिसला सोडायला गेलेल्या पतीला अडविण्यात आले. आधी पकडलेल्या सात ते आठ गाड्या तपासणी सुरू असल्याने त्यांनाही वेळ लागला.
सर, तीन महिन्यांनंतर कामावर निघालोय!
‘गाडी पकडली की चालक गाडी सोडा, गाडी सोडा, असे सांगत मागे लागतात. बºयाचदा तर ठाण्याबाहेर गर्दी करतात. बºयाच तरुणांनी तर अगदी जवळ येऊन फाईन घेऊन सोडा साहेब कामावर जायचे आहे, तीन महिन्यांनी नोकरीवर जातोय असेही सांगितले.’ मात्र त्यांची समजूत काढताना किंवा कागदपत्रे पाहताना ते आमच्या संपर्कात येतातच.