राज्यात दिवसभरात ३१ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:06 AM2021-05-30T04:06:36+5:302021-05-30T04:06:36+5:30
नवीन २०,२९५ बाधितांचे निदान; ४४३ मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ३१,९६४ रुग्ण बरे होऊन ...
नवीन २०,२९५ बाधितांचे निदान; ४४३ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ३१,९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण ५३,३९,८३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात शनिवारी २०,२९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४४३ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.६५% एवढा आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,१३,२१५ झाली असून एकूण मृत्यू ९४ हजार ३० आहेत. सध्या २ लाख ७६ हजार ५७३ रुग्ण उपचाराधीन आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४६,०८,९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.५१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २०,५३,३२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १४,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ४४३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १५५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
..............................................