Join us

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ३९ हजारांहून अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:07 AM

उपचाराधीन रुग्ण साडे तीन लाखांहून अधिकराज्यात दिवसभरात काेराेनाचे ३९ हजारांहून अधिक रुग्णदैनंदिन मृत्यूंचा उच्चांक; २४ तासांत २२७ ...

उपचाराधीन रुग्ण साडे तीन लाखांहून अधिक

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ३९ हजारांहून अधिक रुग्ण

दैनंदिन मृत्यूंचा उच्चांक; २४ तासांत २२७ बळी, मुंबईत ५,३९४ नव्या बाधितांचे निदान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून, ३ लाख ५६ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

दिवसभरात २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्राण ८५.३४ टक्क्यांवर गेले असून, मृत्युदर १.९४ टक्के असल्याची नोंद आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९७ लाख ९२ हजार १४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.२१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १७ लाख २९ हजार ८१६ व्यक्ती होम क्वांरटाइनमध्ये आहेत, तर १७ हजार ८६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

* मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर

मुंबईत बुधवारी ५ हजार ३९४ रुग्ण आढळले असून, १५ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख १४ हजार ७१४ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ६८६ झाला आहे. सध्या शहर, उपनगरात ५१ हजार ४११ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. २४ ते ३० मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३७ टक्के असल्याचे दिसून आले. मुंबईत दिवसभरात ४१ हजार ३६३ कोरोना चाचण्या झाल्या असून, आतापर्यंत ४० लाख ८३ हजार १७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहर, उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ७२ असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६१६ आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २८ हजार ६२१ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

.....................