राज्यात आतापर्यंत ४ कोटी ७१ लाखांहून अधिक जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:09 AM2021-08-12T04:09:44+5:302021-08-12T04:09:44+5:30
मुंबई : राज्यात सोमवारी ३ लाख ८५ हजार ५७ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण ४ ...
मुंबई : राज्यात सोमवारी ३ लाख ८५ हजार ५७ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण ४ कोटी ७१ लाख ५८ हजार २१२ जणांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे.
१२ लाख ८९ हजार ८१९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, ९ लाख ३४ हजार ४१० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ३० लाख ६६ हजार २२६ जणांना लसीचा पहिला डोस तर ९ लाख ७४ हजार १९१ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ८५ लाख ६० हजार ४४४ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ८९ लाख ६७ हजार ७१५ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. २१ लाख २७ हजार ६५५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस तर १२ लाख ३७ हजार ७५२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.