राज्यात दिवसभरात ४० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:05 AM2021-05-23T04:05:58+5:302021-05-23T04:05:58+5:30

मुंबई : राज्यात शनिवारी ४० हजार २९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण ...

More than 40,000 corona free patients in the state every day | राज्यात दिवसभरात ४० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात दिवसभरात ४० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Next

मुंबई : राज्यात शनिवारी ४० हजार २९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४ टक्क्यांवर आले आहे, तर सध्या ३ लाख ५२ हजार २४७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात २६ हजार १३३ रुग्ण आणि ६८२ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ५३ हजार २२५ इतकी असून, मृतांचा आकडा ८७ हजार ३०० आहे. राज्याचा मृत्युदर १.५७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २७ लाख २३ हजार ३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.९७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २७ लाख ५५ हजार ७२९ व्यक्ती होम क्वाॅरंटाइनमध्ये आहेत, तर २२ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या ६८२ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २९० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या ६८२ मृत्यूंमध्ये मुंबई ५२, ठाणे ४, नवी मुंबई मनपा ६, पालघर ५, वसई-विरार मनपा ७, रायगड २४, पनवेल मनपा ८, नाशिक १५, नाशिक मनपा १६, अहमदनगर २८, अहमदनगर मनपा ८, धुळे १, धुळे मनपा १, जळगाव १०, जळगाव मनपा २, नंदूरबार २, पुणे ३५, पुणे मनपा १५, पिंपरी-चिंचवड मनपा ३, सोलापूर ३५, सोलापूर मनपा ८, सातारा १५, कोल्हापूर ३५, कोल्हापूर मनपा ८, सांगली ३०, सांगली-मिरज- कुपवाड मनपा ६, सिंधुदुर्ग १७, रत्नागिरी १४, औरंगाबाद १२, औरंगाबाद मनपा २५, जालना ७, हिंगोली ६, परभणी ३, परभणी मनपा १, लातूर १६, उस्मानाबाद १७, बीड ५३, नांदेड ९, अकोला ५, अकोला मनपा ६, अमरावती १२, अमरावती मनपा ५, यवतमाळ १३, बुलढाणा ४, वाशिम८, नागपूर ७, नागपूर मनपा ७, वर्धा १८, चंद्रपूर ६, चंद्रपूर मनपा ३, गडचिरोली २९ इ. रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय उपचाराधीन रुग्ण

पुणे ५४,१९८

मुंबई २८,२३२

ठाणे २५,३३७

नागपूर १८,४८२

सोलापूर १८,०९५

नाशिक १६,२४०

वयोगटनिहाय रुग्णसंख्या

वयोगटरुग्णसंख्या

०-१० १,६९,५१८

११-२० ३,८९,३०१

२१-३० ९,८७,२०६

३१-४० १२,३०,४९०

४१-५० ९,९४,३०६

५१-६० ८,१२,५९७

६१-७० ५,६२,५३९

७१-८० २,७१,३८६

८१-९० ७७,०३७

९१-१००१०,८८९

१००-११० १२४१

Web Title: More than 40,000 corona free patients in the state every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.