गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी ४० हजारांहून अधिक पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 03:28 AM2019-09-01T03:28:36+5:302019-09-01T03:29:01+5:30

काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याने देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

More than 40,000 policemen to arrange Ganeshotsav mumbai | गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी ४० हजारांहून अधिक पोलीस

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी ४० हजारांहून अधिक पोलीस

Next

मुंबई : विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर झाले असताना या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज झाले असून ४० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात केला जाणार आहे. त्यासाठी सशस्त्र दल, राज्य राखीव दल, बीडीडीएस, होमगार्ड आदी पथकांचीही मदत घेतली जाईल. रविवारपासून बंदोबस्त लागू केला जाणार आहे.

काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याने देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव व मोहरम एकत्र येत असल्याने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. शहर व उपनगरातील सर्व प्रमुख सार्वजनिक मंडळे, गर्दीच्या ठिकाणी गणवेशाबरोबरच साध्या वेशातही पोलीस तैनात असतील. महिला व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

१ सप्टेंबरपासून मोहरम तर २ तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. एकाच कालावधीत दोन्ही समाजांचे प्रमुख सण येत असल्याने या काळात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. महानगरात १ लाख ३२ हजार ४५२ घरगुती व ७ हजार ७०३ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. तर ११ हजार ६६७ गौरींची स्थापना करण्यात येते. सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आपापली मंडळे व परिसरात येणाºया गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

‘लालबागचा राजा’साठी विशेष बंदोबस्त
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून वादावादी व मारामारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या वेळी येथे विशेष खबरदारी घेतली आहे. लालबाग परिसरात गणेशोत्सव काळात एक पोलीस उपायुक्त, ४ साहाय्यक आयुक्त, २० निरीक्षक, ५९ साहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, १०० महिला पोलिसांसह ५०० अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी, दंगल नियंत्रण पथक, ७० मेटल डिटेक्टर, २ सीसीटीव्ही व्हॅन व ४ कॉम्बॅक्ट व्हॅनचा समावेश असेल. २४ तास साध्या वेशात येथे पोलीस लक्ष ठेवणार आहेत. हुल्लडबाज नागरिकांबरोबर उद्धट वर्तणूक करणाºया मंडळांच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Web Title: More than 40,000 policemen to arrange Ganeshotsav mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.