Join us

राज्यात आतापर्यंत ४ कोटी ४५ लाखांहून अधिक जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 4:02 AM

मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ५ लाख ७३ हजार ६९८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ...

मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ५ लाख ७३ हजार ६९८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४ कोटी ४५ लाख ८३ हजार ३२ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी १७ लाख ९७ हजार ४८३ जणांनी लसीचा पहिला डोस, तर ६ लाख ६५ हजार ३१४ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ८१ लाख ७३ हजार ६८९ जणांनी लसीचा पहिला डोस, तर ८४ लाख २९ हजार ४११ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ८८ हजार ९१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ९ लाख १८ हजार ९७७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख २२ हजार २१४ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर ११ लाख ८७ हजार ६५५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

जिल्हा लाभार्थी

मुंबई ७४८४९४२

पुणे ६३२४४०३

ठाणे ३५०६३६९

कोल्हापूर १८२८४६४

नागपूर २४६५१६०