ताउते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:06 AM2021-05-16T04:06:57+5:302021-05-16T04:06:57+5:30
मुंबई : ताउते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या नियोजित स्थानकाऐवजी ...
मुंबई : ताउते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या नियोजित स्थानकाऐवजी अहमदाबाद येथेच थांबविण्यात येणार आहेत.
दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ताउते’ चक्रीवादळ अधिक सक्रिय झाले असून, ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा सतर्क झाली आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने काही गाड्या रद्द, तर काही गाड्या कमी अंतरासाठी धावणार आहेत.
वादळाच्या पार्श्वभूमीवर १५ ते २१ मेदरम्यान दादर-भूज, बांद्रा टर्मिनस-भूज, मुंबई सेंट्रल-ओखा, बांद्रा टर्मिनस-भावनगर टर्मिनस, भावनगर-बांद्रा टर्मिनस भूज-बांद्रा टर्मिनस, पुणे-भूज यांसह ५०हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळामुळे १४ मे १८ मेदरम्यान काही गाड्या अहमदाबादपर्यंतच धावणार आहेत. यामध्ये पुरी-गांधीधाम, रामेश्वरम-ओखा, ओखा-रामेश्वरम, एर्नाकुलम-ओखा, ओखा-एर्नाकुलम या गाड्यांचा समावेश आहे.