मुंबई : मुंबईच्या विविध भागांमधील ५०० हून अधिक मांजरांची नसबंदी केली आहे. या मांजरांना त्यांच्या मूळ जागी पाठविताना त्यांच्यावर लसीकरण, इजांवर उपचार, नसबंदी झाल्याचा पुरावा म्हणून इअर टॅग्स लावण्यात आले आहेत. ‘पीपल फॉर इथिकल ट्रिटमेंट आॅफ अॅनिमल्स’ (पिटा) इंडियाने बॉम्बे सोसायटी फॉर दी प्रिव्हेंशन आॅफ कु्रएल्टी टू अॅनिमल्स आणि युथ आॅर्गनायझेशन इन डिफेन्स आॅफ अॅनिमल्स यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविला़
भटक्या जनावरांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जनावरांचा भुकेचा प्रश्न असतो. त्यांना जाणूनबुजून छळले जाते किंवा ठार मारले जाते. अनेकांचा वाहन अपघातांमध्ये मृत्यू होतो. काही जनावरांना प्राण्यांच्या छावण्यांमध्ये आयुष्य काढावे लागते. कारण त्यांच्यासाठी पुरेशी चांगली घरे उपलब्ध नसतात. ब्रीडरकडून किंवा पेट शॉपमधून जेव्हा एखादी व्यक्ती मांजर किंवा श्वान विकत घेते तेव्हा रस्त्यावर हिंडणाऱ्या किंवा प्राण्यांच्या छावण्यांमध्ये आयुष्य काढणाºया एका बेघर जनावराला घर मिळण्याची संधी त्यांच्याकडून हिरावली जाते.पिटा इंडियाचे इमर्जन्सी रिस्पॉन्स कॉडिनेटर दीपक चौधरी यांनी यासंदर्भात सांगितले की, वांद्रे (प.), सायन-धारावी, अंधेरी (प.) आणि फोर्ट या विभागात असलेल्या मच्छी मार्केट, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणांहून मांजरांना ताब्यात घेतले. नसबंदीमुळे जन्माला येणाºया हजारो पिल्लांची रस्त्यावरील मरणयातनांपासून सुटका होईल. रस्त्यावरच्या जीवनामध्ये त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पिटा इंडिया एवढ्यावरच थांबणार नाही. शहरातील अधिकाधिक मांजरांना मदत करण्यासाठी अत्यावश्यक सेवेचा विस्तार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.एका श्वानाची नसबंदी केल्याने सहा वर्षांमध्ये ६७ हजार पिल्लांच्या जन्माला प्रतिबंध होऊ शकतो. तर एका नर मांजराची नसबंदी केल्याने सात वर्षांमध्ये ४ लाख २० हजार पिल्लांच्या जन्माला प्रतिबंध होऊ शकतो. तसेच नसबंदी झालेली जनावरे दीर्घकाळ, अधिक आरोग्यदायी जीवन जगतात. नपुंसक नराकडून भटकण्याची, लढण्याची आणि चावा घेण्याची शक्यता कमी असते.