Join us

राज्यात गुरुवारी कोरोनाचे ५६ हजारांहून अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात गुरुवारी कोरोनाचे ५६,२८६ रुग्णांचे निदान झाले असून, ३७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात गुरुवारी कोरोनाचे ५६,२८६ रुग्णांचे निदान झाले असून, ३७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात पुन्हा दैनंदिन मृत्यूंची उच्चंकी नोंद झाली आहे. सध्या ५ लाख २१ हजार ३१७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ३६,१३० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आतापर्यंत एकूण २६,४९,७५७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०५% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१३,८५,५५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.१० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,०२,६१३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २२,६६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

एकूण ३७६ मृत्यूंपैकी १३६ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ११० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १३० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ३७६ मृत्यूंमध्ये मुंबई २५, ठाणे ४, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा ५, कल्याण डोंबिवली मनपा ७, भिवंडी निजामपूर मनपा १, मीरा भाईंदर मनपा ४, वसई विरार मनपा २८, रायगड १, पनवेल मनपा २, नाशिक २२, नाशिक मनपा ४, मालेगाव मनपा १, अहमदनगर १२, अहमदनगर मनपा ३, धुळे ८, जळगाव ३, जळगाव मनपा २, नंदुरबार ४, पुणे ७, पुणे मनपा ३३, पिंपरी चिंचवड मनपा ६, सोलापूर ११, सोलापूर मनपा १०, सातारा १२, कोल्हापूर २, सांगली ७, सांगली-मिरज-कुपवाड मनपा १, रत्नागिरी ४, औरंगाबाद २, औरंगाबाद मनपा २, जालना ३१, हिंगोली १, परभणी ४, परभणी मनपा ६, लातूर १, लातूर मनपा २, उस्मानाबाद १०, बीड ४, नांदेड १३, नांदेड मनपा १३, अकोला मनपा ५, अमरावती ४, अमरावती मनपा ४, बुलडाणा २, वाशिम २, नागपूर ८, नागपूर मनपा २८, चंद्रपूर मनपा १ इ. रुग्णांचा समावेश आहे.