राज्यात ६० लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनाला हरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:06 AM2021-07-21T04:06:50+5:302021-07-21T04:06:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ७ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ...

More than 6 million patients lost corona in the state | राज्यात ६० लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनाला हरविले

राज्यात ६० लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनाला हरविले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ७ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६० लाख ९११ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के झाले असून, सध्या ९४ हजार ५९३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात मंगळवारी ६ हजार ९१० रुग्णांचे निदान झाले असून, १४७ मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५८ लाख ४६ हजार १६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.५९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ३५४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार ९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६२ लाख २९ हजार ५९६ झाला असून, बळींची संख्या १ लाख ३० हजार ७५३ आहे. दिवसभरात नोंद झालेल्या १४७ मृत्यूंमध्ये मुंबई १०, नवी मुंबई मनपा २, रायगड २३, पनवेल मनपा ४, नाशिक ३, अहमदनगर ६, पुणे ३, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ३, सातारा ३०, कोल्हापूर १६, कोल्हापूर मनपा ७, सांगली १४, सांगली मिरज कुपवाड मनपा ४, सिंधुदुर्ग ४, रत्नागिरी १०, औरंगाबाद ३, उस्मानाबाद १, बीड १, अमरावती १, नागपूर मनपा १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत १० हजार ६३८, ठाण्यात १२ हजार ५४९, पुण्यात १५ हजार ४२ आणि कोल्हापूर १० हजार १०० रुग्ण उपचाराधीन आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजेच केवळ १५ रुग्ण उपचाराधीन असल्याची नोंद आहे.

Web Title: More than 6 million patients lost corona in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.