Join us

६० टक्क्यांहून अधिक जागा रिकाम्या राहणार, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 5:50 AM

राज्यातील खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये सुरू असलेल्या प्रवेशाचा तिढा अद्याप कायम असून राज्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ६० टक्क्यांहून अधिक जागा रिकाम्या राहणार असल्याची चिन्हे आहेत.

मुंबई : राज्यातील खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये सुरू असलेल्या प्रवेशाचा तिढा अद्याप कायम असून राज्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ६० टक्क्यांहून अधिक जागा रिकाम्या राहणार असल्याची चिन्हे आहेत.राज्यातील खासगी वैद्यकीय कॉलेज आणि शुल्क नियंत्रण समिती यांच्यातील वादातच वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाची पहिली फेरी गुरुवारी संपली. संस्थाचालकांच्या अडवणुकीमुळे खासगी कॉलेजच्या ४०० विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. १७पैकी १२ कॉलेजेस निर्णयावर ठाम राहिल्याने ४०० जागांपैकी २५० हून अधिक जागा गुरुवारी पहिल्या फेरीच्या शेवटी रिकाम्या राहणार असल्याचे समजते. मॅनेजमेंटच्या जागांवर शुल्क वाढवून हवे असल्यास किमान एनआरआय, मेरिट कोट्यातील जागा संस्थांनी भराव्या ही संचालनालयाची विनंती संस्थांनी नाकारल्याचे डीएमईआरचे संचालक प्रवीण शिनगारे यांनी सांगितले.>स्पेशल टास्क फोर्सवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालयांतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण होण्यासाठी ‘स्पेशल टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या स्पेशल टास्क फोर्समध्ये अध्यक्षांसह सात सदस्य आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाचे सचिव अध्यक्षस्थानी असतील. सदस्यांत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने, टाटा रुग्णालयाचे डॉ. कैलास शर्मा आदींचा समावेश आहे.

टॅग्स :विद्यार्थी