Join us

८० टक्क्यांपेक्षा जास्त बेड कोविड रुग्णांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ब्रह्माकुमारी ही आंतरराष्ट्रीय, स्वयंसेवी, आध्यात्मिक संस्था असून त्याचे मुख्यालय राजस्थानातील माऊंटआबू येथे आहे. सकारात्मक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ब्रह्माकुमारी ही आंतरराष्ट्रीय, स्वयंसेवी, आध्यात्मिक संस्था असून त्याचे मुख्यालय राजस्थानातील माऊंटआबू येथे आहे. सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न ब्रह्माकुमारी करीत आहे. समाजातील सर्व स्तरांत त्यांचे कार्य असून, अंधेरी पश्चिम येथील ब्रह्माकुमारी जीएचआरसीद्वारे व्यवस्थापित बीएसईएस एमजी रुग्णालय कोविड लसीकरण केंद्र बनले आहे. सध्या रुग्णालयात ८० टक्क्यांपेक्षा जास्त बेड कोविड रुग्णांना देण्यात आले आहेत.

रोटरी क्लब ऑफ मुंबई, जुहू येथील महासंचालक सुनील मेहरा, अध्यक्ष स्मिता शहा, सचिव सुपाल शाह आणि एशलँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नेल्सन कोर्डा यांनी ५ लीटरचे २ ऑक्सिजन मशीनचे योगदान दिले आहे. हितेंद्र कोठारी असोसिएशनने हाय फ्लो ऑक्सिजन दान केले आहे. याव्यतिरिक्त भारत झुनझुनवाला यांनी व्हेंटिलेटर दान केले. तर लसीकरणानंतर सोनू सूद, गायिका मीका सिंह आणि संगीता शंभेकर यांनी या कामाचे कौतुक केले आहे.

........................................................