मुंबईत २४ तासांत ९ हजारांहून अधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:06 AM2021-04-15T04:06:14+5:302021-04-15T04:06:14+5:30
मुंबई : मुंबईत बुधवारी ९ हजार ९२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली, तर ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
मुंबई : मुंबईत बुधवारी ९ हजार ९२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली, तर ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ९ हजार २७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. एकूण ५२ हजार २६६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत यापूर्वी सलग दोन दिवस वीकेंड लाॅकडाऊनच्या परिणामामुळे दैनंदिन रुग्णसंख्येत घट झालेली दिसून आली होती. शहर उपनगरात १३ एप्रिल रोजी ७८९८, तर १२ एप्रिल रोजी ६९०५ रुग्णांचे निदान झाले होते.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८१ टक्के असून, ७ ते १३ एप्रिलपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर १.७१ टक्के नोंद करण्यात आला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४० दिवसांवर गेला आहे. मुंबईत आतापर्यंत ५ लाख ४४ हजार ९४२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ४ लाख ४४ हजार २१४ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत १२ हजार १४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४७ लाख ५५ हजार ७३३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या ९० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर ९९५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत रुग्णांच्या सहवासातील ३० हजार ५४९ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.