राज्यात पाच जिल्ह्यांत सक्रिय रुग्ण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:08 AM2021-02-16T04:08:20+5:302021-02-16T04:08:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू झाला, शिवाय दुसऱ्या बाजूला मुंबईतील लोकल लोकल सेवाही सुरू ...

More active patients in five districts in the state | राज्यात पाच जिल्ह्यांत सक्रिय रुग्ण अधिक

राज्यात पाच जिल्ह्यांत सक्रिय रुग्ण अधिक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू झाला, शिवाय दुसऱ्या बाजूला मुंबईतील लोकल लोकल सेवाही सुरू झाली परिणामी वाढत्या गर्दीमुळे कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असल्याचे दिसून येते आहे. राज्यातील पाच प्रमुख जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहेस त्यामुळे पुन्हा एकदा यंत्रणांना समोर हा संसर्ग नियंत्रणात आणण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, अमरावती आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या चार हजारांच्या घरात आहे. त्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात असून, ही संख्या ६ हजार ५०३ एवढी आहे. त्याखालोखाल, ठाण्यात ४ हजार ८६२, मुंबईत ४ हजार १२०, नागपूर ४ हजार ४२९ आणि अमरावतीत ३ हजार ९० सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यासह मुंबई पुढच्या टप्प्यातील अनलॉक सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने रुग्ण वाढीची शक्यता वर्तविली होती हा धोका ओळखून टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवा आणि वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; यंत्रणांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात खबरदारी घेऊनही राज्यात व मुंबईत कोरोनाचे रुग्ण काहीसे वाढताना दिसत आहे त्यामुळे पुन्हा एकदा वैद्यकीय तज्ञांनी याविषयी चिंता व्यक्त केली असून, सर्वसामान्यांसह सर्वांनीच करुणा विषयक मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचा सल्ला दिला आहे.

* मुंबईतही रुग्ण वाढले

मागील काही दिवसांपासून सरूपा नवरा दैनंदिन रुग्णसंख्या व मृत्यूंमध्ये घट झालेली दिसून येत होती मात्र तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा सुरू झाल्यानंतर याचा काहीसा परिणाम पुरणाच्या संसर्गावर झालेला आढळून आला आहे मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आलेली आहे. मुंबईत दि. ९ फेब्रुवारी रोजी दिवसभरात ३७५ रुग्ण आढळून आले होते. मात्र दि. १० फेब्रुवारी रोजी यात वाढ होऊन दिवसभरात ५५८ रुग्णांची नोंद करण्यात आली. याविषयी राज्याच्या ट्रान्सपोर्टचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी सांगितले शहर उपनगरातील रुग्ण वाढत असल्यास याची विविध कारणे असू शकतात याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे, मात्र रुग्णवाढीसाठी केवळ लोकल सेवा सुरू केल्याने रुग्ण वाढले असल्याचे मत मांडणे हे घाईचे होईल.

....................

Web Title: More active patients in five districts in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.