बिल्डरांची साथ मिळाल्यास अधिकाधिक परवडणारी घरे; मंत्री अतुल सावेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 08:21 AM2024-09-09T08:21:50+5:302024-09-09T08:22:30+5:30

गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात गृहनिर्माणासाठी झाली सखोल चर्चा

More affordable housing if builders are supported; Faith of Minister Atul Save | बिल्डरांची साथ मिळाल्यास अधिकाधिक परवडणारी घरे; मंत्री अतुल सावेंचा विश्वास

बिल्डरांची साथ मिळाल्यास अधिकाधिक परवडणारी घरे; मंत्री अतुल सावेंचा विश्वास

मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी घरे लोका देण्यासाठी 'म्हाडा' आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण' (एसआरए) एकत्र काम करत असून, आता 'म्हाडा' २ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. 'म्हाडा'च्या घरांसाठी १५ पट अर्ज देत. आहेत. याचा अर्थ या घरांना मागणी आहे. म्हणून आम्ही अधिकाधिक परवडणारी घरे बांधणार आहोत; मात्र हे सगळे करताना लोकांनी, बिल्डरांनी आमच्याकडे आले पाहिजे. 'म्हाडा'च्या पुनर्विकास प्रकल्पांत बिलारांनीही सामील व्हावे, असा आमचा त्यांना आग्रह आहे, असे झाल्यास अधिकाधिक परवडणाऱ्या घरांची निर्मिती होईन, असा विश्वास गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. 

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने 'बिल्डिंग न्यू इंडिया' या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आलेल्या 'लोकमत रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०२४ मध्ये गृहनिर्माणमंत्री सावे बोलत होते. यावेळी 'महारेरा'चे अध्यक्ष अजय मेहता, म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, 'सिडको'चे उपाध्यक्ष विजय सिंघल यांच्यासह लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दहीं उपस्थित होते.

गृहनिर्माण मंत्री सावे म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिचा पसारा वाढतो आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासह मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि मेट्रो यांसारखे प्रकल्प उभे राहत असतानाच सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे बांधण्यासाठी 'म्हाडा' आणि 'एसआरए' एकत्र काम करीत आहेत. 'म्हाडा'च्या वतीने राज्यात १ लाख घरे बांधली जात असून, सोलापूरमध्ये ३३ हजार घरे बांधण्यात आली आहेत. कामगारांना १७ हजार घरे देण्यात आली आहेत. १ लाख गिरणी कामगारांची नोंदणी सुरू असून, त्यांना मुंबईजवळच घरे देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुंबईजवळ जागांचा शोध सुरु आहे.

सगळे प्रकल्प मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार

देशातल्या प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे. म्हाडा, एसआरएसारखी प्राधिकरणाने याद 1 दृष्टीने पाऊले उचलत आहेत. या दृष्टीकोनातून mat याहतुकीच्या पायाभूत सेवा सुविधांतों संबंधित कामे वेगाने केली जात आहेत. यास जोड माणून आता आपण परवडणाऱ्या घरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. हे करतानाच धारावीसारखा मोठा प्रकल्प सुरु आहे. सत शिवाय कामाठीपुरा पुनर्विकासाचे काम सुरु आहे. हेर सगळे प्रकल्प मुंचाईचा चेहरा मोहरा बदलणार आहेत. दरम्यान न. बिल्डरांसह उपस्थितांनी मांडलेल्या मुद्यावरही सावे यांनी सरकारचे प्रत्येक प्रकल्पाला सहकार्य आहे, असा विस्वास व्यक्त केला. बिल्डरांना सहकार्य करतानाच प्रत्येक नागरिकाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी काम केले जाईल, असे सांगितले,

Web Title: More affordable housing if builders are supported; Faith of Minister Atul Save

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.