Join us

कोविशिल्डचे लाभार्थी अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत १६ जानेवारीपासून केंद्र शासनाच्या परवानगीने ‘कोविड-१९’ लसीकरण मोहीम कार्यन्वित करण्यात आली आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत १६ जानेवारीपासून केंद्र शासनाच्या परवानगीने ‘कोविड-१९’ लसीकरण मोहीम कार्यन्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची ‘कोविशिल्ड’ लस उपलब्ध करुन देण्यात आली. तर १५ मार्चपासून भारत बायोटेक कंपनीद्वारे निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ ही लस वापरण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर वेगाने सुरु झालेल्या लसीकऱण मोहिमेत कोविशिल्डचे लाभार्थी सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून त्याला रोखण्यासाठी महापालिकेद्वारे व शासनाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनावर औषध नसल्याने लस घेणे हा याच उपाययोजनांचा एक भाग आहे. लस घेतलेली असो किंवा अद्याप घ्यावयाची बाकी असो, सर्वच नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी कोरोनाबाबतच्या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे किंवा वारंवार हात धुणे महत्वाचे असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकार डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

लसीकरणाबाबत सरकारने धोरण स्पष्ट केले आहे, कोविशिल्ड लसीचे २ डोस घेण्याचा नियम कायम आहे. याबाबत कुठलाही संभ्रम बाळगू नये. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्याच्या १२ आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा. कोवॅक्सिन लसीचेही दोन डोस घ्यायचे आहेत. कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा ३ ते ४ आठवड्यात घ्यावा, अशी माहिती राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे.

कोविशिल्डकोव्हॅक्सिन स्पुतनिक

९३ टक्के७ टक्के० टक्के

एकूण लसीकरण ३९,४९,७७९३,०५,६२६९०७

पहिला डोस३२,२३,९१६१,८५,५९८९०७

दुसरा डोस७,२५,८६३१,२०,०२८०

आतापर्यंतचे एकूण लसीकरण

एकूण लसीकऱण – ४२,५६,३१२

पहिला डोस – ३४,१०,४२१

दुसरा डोस – ८,४५,८९१

मुंबईतील एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी ३३८३०८

फ्रंटलाइन कर्मचारी ३९७५८८

१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी १२९६९५८

४५ हून अधिक वयोगटातील लाभार्थी २६९७७६८