हँकॉकनंतर आणखी काही पुलांचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:18 AM2018-02-09T02:18:03+5:302018-02-09T02:18:09+5:30

सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच हिरवा कंदिल मिळाला. त्यापाठोपाठ आणखी काही पुलांची दुरूस्ती व विस्तार होणार आहे.

More bridges expanded after Hancock | हँकॉकनंतर आणखी काही पुलांचा विस्तार

हँकॉकनंतर आणखी काही पुलांचा विस्तार

Next

मुंबई : सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच हिरवा कंदिल मिळाला. त्यापाठोपाठ आणखी काही पुलांची दुरूस्ती व विस्तार होणार आहे.
गेल्या वर्षी मुंबईतील २४ पुलांचे काम पालिकेने हाती घेतले होते. यामध्ये मानखुर्द घाटकोपर जोड रस्ता येथील उड्डाणपुलाचे काम, नाहूर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे पोहोचमार्ग, सीएसटी रोड, कुर्ला(प.) येथील मिठी नदीवरील पूल या प्रमुख कामांचा समावेश होता. या मुख्य पुलांच्या कामावर तब्बल ८२५ कोटी ५८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या वर्षी हँकॉक पूल, मिठी नदीवरील ड्राईव्ह इन थिएटर जवळील पूल, अमरनाथ टॉवर इमारत जवळील पूल, विक्रोळी रेल्वे स्थानक येथील प्रस्तावित रेल्वेवरील पुलासाठी पोहोचमार्ग या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यापैकी हँकॉक पुलाचे काम लवकरच सुरू होईल. त्याचबरोबर मुंबईतील पाच मोठ्या पुलांचे विस्तारीकरण होणार आहे. यासाठी ४६७ कोटी ९२ लाख रुपये खर्च होणार आहेत.
>या पुलांचा विस्तार
गोरेगावमधील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे पश्चिम बाजुचे विस्तारीकरण, बोरिवली पूर्वकडील सुधीर फडके उड्डाणपुलाचा विस्तार, मुलुंड जकात नाक्याजवळील पूल. मानखुर्द, साठेनगर येथील पादचारी पूल, महालक्ष्मी येथे हाजी अलीकडे जाणारा एक व वरळी नाक्याकडे जाणार दुसरा असे रेल्वेवरील दोन पूल.

Web Title: More bridges expanded after Hancock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.