ड्रग्ज कनेक्शनमध्ये आणखी बडी नावे समोर येणार; क्षितिजला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 06:44 AM2020-09-28T06:44:51+5:302020-09-28T06:45:33+5:30
प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित कंपनीसोबत एका प्रकल्पासाठी सहदिग्दर्शक म्हणून करार केलेल्या क्षितिजला शनिवारी एनसीबीने अटक केली
मुंबई : सध्या गाजत असलेल्या बालीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या क्षितिज रविप्रसाद याला ३ आॅक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी जप्त केलेले ड्रग्ज व बँक व्यवहाराची तपासणी केली जाणार असून त्यातून आणखी काही बडी नावे उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित कंपनीसोबत एका प्रकल्पासाठी सहदिग्दर्शक म्हणून करार केलेल्या क्षितिजला शनिवारी एनसीबीने अटक केली. त्याची कोरोना व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रविवारी त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायदंडाधिकाऱ्या समोर उभे करण्यात आले. यावेळी त्याच्या घरातून सिगारेट गांजाबरोबरच काही रोख रक्कम व बँके खात्याबाबत माहिती मिळाली आहे. त्याबाबत सविस्तर तपासासाठी ९ दिवस कोठडी द्यावी, अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली. तर, आपल्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकविण्यात आल्याचा दावा क्षिजिने केला. अखेर न्यायदंडाधिकाºयांनी सहा दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान, करण जोहरने क्षितिजचा धर्मा प्रॉडक्शनशी कसलाही संबंध नाही, त्याला आपण ओळखतही नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात याआधी अनेक आघाडीच्या अभिनेत्रींचीही नावे जोडली गेली आहेत.