Join us

पाच लाखांहून अधिक मुंबईकरांनी घेतली लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 2:37 AM

राज्यात आतापर्यंत २४ लाख, ३४ हजार जणांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत लसीकरणाने पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात गुरुवारी ८० हजार ७०५ जणांना लस देण्यात आली.  ७९ हजार ७४८ जणांना कोविशिल्ड, तर ९५७ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली.  राज्यात आतापर्यंत २४ लाख ३४ हजार ९६६ जणांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सना aलस देण्यात येत होती. १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.  मुंबईत दिवसभरात ३६ हजार ९३३ नागरिकांना लस देण्यात आली. 

मुंबईत गुरुवारी ३६ हजार ९३३ जणांचे लसीकरण झाले. त्यातील ३२ हजार ५७४ जणांना पहिला, तर ४ हजार ३५९ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण ५ लाख १३ हजार ६८६ जणांना लस देण्यात आली. त्यात ४ लाख ५० हजार ७८१ जणांना पहिला, तर ६२ हजार ९०५ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण १ लाख ८० हजार २३३ आरोग्य कर्मचारी, १ लाख २० हजार ११५ फ्रंटलाइन वर्कर्स, १ लाख ९० हजार २९४ ज्येष्ठ, तर ४५ ते ५९ वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या २३,०४४ जणांना लस देण्यात आली. मुंबई पालिकेच्या लसीकरण केंद्रावर आतापर्यंत ३ लाख ५७ हजार १३७ जणांना पहिला, तर ५४,५२३ जणांना दुसरा अशाप्रकारे एकूण ४ लाख ११ हजार ६६० जणांना लसीकरण करण्यात आले. 

आतापर्यंत मुंबईत झालेले लसीकरण

nकर्मचारी - १,८०,२३३nफ्रंटलाईन वर्कर्स - १,२०,११५nज्येष्ठ नागरिक - १,९०,२९४n४५ ते ५९ वर्षांमधील गंभीर आजार असलेले - २३,०४४nएकूण - ५,१३,६८६

nमुंबईतील खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत ८० हजार २२३ जणांना पहिला, तर ६ हजार ५४८ जणांना दुसरा अशाप्रकारे एकूण ८६ हजार ७७१ जणांना लस देण्यात आली. 

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई