Join us

देशात नोकरीच्या अधिक संधी!

By admin | Published: December 26, 2016 7:10 AM

देशात नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : देशात नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. दालमिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट एनरिचमेंट अ‍ॅण्ड एम्लॉयमेंट डेव्हलपमेंट (सीड) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमावेळी केलेल्या सर्वेक्षणात ६५ टक्के विद्यार्थ्यांनी हे मत व्यक्त केले. ११ ते २१ डिसेंबरदरम्यान, हे सर्वेक्षण करण्यात आले. कॉर्पोरेट जग आणि अभ्यासक्रमातील तफावत, त्याचा नोकरी कौशल्यावर होणारा परिणाम ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. ‘सीड’तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ टक्के विद्यार्थ्यांनी देशात नोकरीच्या संधी आधीपेक्षा वाढल्याचे मत व्यक्त केले. महाविद्यालातील शिक्षकदेखील कॉर्पोरेट क्षेत्रात आवश्यक कौशल्यांसाठी मार्गदर्शन करीत आहेत. एखादी कंपनी विद्यार्थ्यांना नोकरीसाठी बोलवते तेव्हा त्यासाठी पदवीपेक्षा त्याच्या कौशल्यांना महत्त्व दिले जाते, असे दालमिया लायन्स कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सचे प्राचार्य डॉ. एन.एन. पांडे यांनी सांगितले.