मुंबईबाहेरील खडीसाठी मोजावा लागणार जादा पैसा

By admin | Published: May 18, 2017 03:35 AM2017-05-18T03:35:30+5:302017-05-18T03:35:30+5:30

डेडलाइन संपण्यास जेमतेम पंधरवडा उरला असल्याने खडी मिळवण्यासाठी पालिकेची तारांबळ उडाली आहे. नवी मुंबईचा मार्ग बंद झाल्यामुळे जास्त पैसे मोजून वसई, पनवेल, पडघा

More money to be paid for outside the city | मुंबईबाहेरील खडीसाठी मोजावा लागणार जादा पैसा

मुंबईबाहेरील खडीसाठी मोजावा लागणार जादा पैसा

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डेडलाइन संपण्यास जेमतेम पंधरवडा उरला असल्याने खडी मिळवण्यासाठी पालिकेची तारांबळ उडाली आहे. नवी मुंबईचा मार्ग बंद झाल्यामुळे जास्त पैसे मोजून वसई, पनवेल, पडघा व उरणवरून खडी विकत घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. याचा भार मात्र पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.
महापालिकेने ५५८ रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यातील दगडखाणी बंद झाल्याने रस्त्याची कामे ठप्प झाली. खडीचा पुरवठा बंद झाल्यामुळे ४४४ रस्त्यांची कामे अर्धवट राहिली आहेत. मुंबईला खडीचा पुरवठा करणाऱ्या दगडखाणीवरील बंदी उठवण्याची विनंती पालिकेने राज्य सरकारकडे केली होती. मात्र, तेथून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आता वसई, पनवेल, पडघा ते उरणवरून जास्त दराने खडी आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खडीचे जास्तीचे दर ठेकेदारांकडून वसूल करण्यात येणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. सध्या रस्त्यावर जेसीबी, डंपर उभे करून ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी रस्ते बांधण्यासाठीची सामग्री खडीअभावी पडून आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी उरकण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.

बंदीची कारणे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दगडखाणींवर हरित लवादाने बंदी आणली आहे. त्यामुळे मुंबईला खडीचा पुरवठा बंद झाला आहे. माल मिळत नसल्याने ठेकेदारांनी रस्त्यांचे काम थांबवले आहे. रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेला ५० हजार क्युबिक मीटर खडीची गरज आहे. मात्र, नवी मुंबईतील दगडखाणींवर बंदी आल्याने ठेकेदारांना मुंबईबाहेरील दगडखाणींतून खडी घ्यावी लागत आहे. महामंडळाचे नियम पळत नसलेल्या ७० दगडखाणींवर ३१ मार्चपासून बंदी आहे.

Web Title: More money to be paid for outside the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.