राज्यात लसीच्या दुसऱ्या डोससाठी १ कोटीहून अधिक लाभार्थी प्रतीक्षेत;आरोग्य विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 07:11 AM2022-01-14T07:11:05+5:302022-01-14T07:11:24+5:30
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती येऊन ठेपली असली तरीही अजूनही राज्यात दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती येऊन ठेपली असली तरीही अजूनही राज्यात दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या ९९ लाख ५९ हजार २६ आहे. तर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांची संख्या १७ लाख ३४ हजार ३७७ इतकी आहे. त्यामुळे राज्यात दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटी १६ लाख ९३ हजार ४०३ इतकी आहे.
सरासरी दैनंदिन डोसेस-
जुलै २१ ३,९१,७१४
ऑगस्ट २१ ४,६७,२२२
सप्टेंबर २१ ७,६०,९५५
ऑक्टोबर २१ ५,२५,१२९
नोव्हेंबर २१ ५,३८,६५२
१ ते ३० डिसेंबर ६,२४,६४२
१ ते ११ जाने ६,५४,४४६