मोठा दिलासा... कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे अधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 06:27 AM2021-05-02T06:27:19+5:302021-05-02T06:27:35+5:30
राज्यात दैनंदिन मृत्यूंचा आकडा चढताच
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून निर्बंधांची कडक अंमलबजावणी होत असल्यामुळे, मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३ हजार ९०८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, परंतु ९० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यात मुंबई महानगरपालिका प्रशासन काही अंशी यशस्वी ठरताना दिसत आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत एकूण ३,९०८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर एकूण ५,९०० कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना साखळी तुटताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बाधितांची संख्या ही कोरोनामुक्त रुग्णांच्या दुप्पट असायची, परंतु निर्बंधांमुळे आता ही संख्या आटोक्यात आणण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे.
मुंबईत आतापर्यंत एकूण ६ लाख ५२ हजार ५३२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ५ लाख ७८ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे १३ हजार २५१ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण ५४ लाख ६१ हजार ६०५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गेल्या २४ तासांत ३७,६०७ चाचण्या केल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मुंबई जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर हा ८९ दिवसांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९६ दिवसांवर आला आहे. २४ ते ३० एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.७० टक्के असल्याची नोंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यात दिवसभरात ६३ हजार २८२ रुग्णांचे निदान झाले असून राज्यातील कोरोनाचा कहर कायम आहे. त्याचप्रमाणे, दैनंदिन मृत्यूंचा आकडाही चढता असून शनिवारी ८०२ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ६५ हजार ७५४ झाली असून मृतांची एकूण संख्या ६९ हजार ६१५ आहे. सध्या राज्यात ६ लाख ६३ हजार ७५८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८४.२४ टक्क्यांवर आला असून मृत्युदर १.४९ टक्के आहे. राज्यात शनिवारी ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७३ लाख ९५ हजार २८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.०३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४० लाख ४३ हजार ८९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या संथगतीने कमी होत असून सध्या पुण्यात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण आहेत, ही संख्या १ लाख ४ हजार ८४९ इतकी आहे. त्याखालोखाल नागपूर ७६२९१, मुंबई ६३३२५, ठाणे ४९९८१, नाशिक ४९२५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ८०२ मृत्यूंमध्ये मुंबई ९०, ठाणे १७, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १२, उल्हासनगर मनपा २, भिवंडी निजामपूर मनपा ३, वसई विरार मनपा ५, रायगड १०, पनवेल मनपा १०, नाशिक ३१, मालेगाव मनपा ४, अहमदनगर १५, अहमदनगर मनपा १७, धुळे २, जळगाव ५, जळगाव मनपा १, नंदूरबार ५, पुणे ५, पुणे मनपा ३९, पिंपरी चिंचवड मनपा ८, सोलापूर १७, सोलापूर मनपा ४९, सातारा २५, कोल्हापूर ७, सांगली १४, सांगली मिरज कुपवाड मनपा ५, औंरगाबाद ६, औरंगाबाद मनपा २५, जालना ७, हिंगोली ५, परभणी ८, परभणी मनपा ३, लातूर १७, लातूर मनपा १०, उस्मानाबाद ३७, बीड २९, नांदेड १४, नांदेड मनपा ५, वाशिम ७, नागपूर १६, नागपूर मनपा ४१, वर्धा १८, भंडारा २४, गोंदिया २, चंद्रपूर १९, चंद्रपूर मनपा १०, गडचिरोली ४ इ. रुग्णांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे दोन हजार ८६९ रुग्ण
ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी दोन हजार ८६९ रुग्णांची वाढ झाली. यामुळे रुग्णसंख्या आता चार लाख ७० हजार ५० झाली असून, ५३ मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सात हजार ६४३ नोंदली आहे.
या रुग्णसंख्येत ठाणे शहरातील ७३२ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे येथील रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६५३ झाली. या शहरात नऊ जणांच्या मृत्यूने एक हजार ६८१ मृतांची नोंद झाली. याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीत ८२२ रुग्ण वाढले आहेत.
उल्हासनगरला ११० रुग्णांसह चार मृतांची वाढ झाली. भिवंडी मनपा क्षेत्रातही २२ रुग्णांमुळे आता नऊ हजार ८७२ रुग्णांची नोंद झाली. मीरा-भाईंदरला ३५९ रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्णसंख्या ४३ हजार ९२७ झाली असून दहा रुग्णांच्या मृत्यूने आतापर्यंत एक हजार ४१ मृतांची नोंद केली आहे.
अंबरनाथला १३२ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १७ हजार ८४५ झाली. या शहरात पाच मृत्यू झाल्याने ३८६ एकूण मृतांची संख्या झाली आहे. कुळगांव बदलापूरला १४८ रुग्णवाढीने १८ हजार ६५६ रुग्णांची नोंद झाली. दोघांच्या मृत्यूने येथील मृतांची संख्या १९४ वर गेली. याशिवाय जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये १६३ रुग्णांची वाढ होऊन एकूण २६ हजार ७८२ रुग्णांची नोंद केली. या गावपाड्यांमध्ये दोन जणांच्या मृत्यूने आजपर्यंत ६९४ मृतांची नोंद करण्यात आली आहे.