राज्यात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दुचाकीला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:07 AM2021-07-30T04:07:26+5:302021-07-30T04:07:26+5:30

पाच वर्षांत ३८,२९३ वाहनांपैकी २७,९४६ दुचाकींची नोंदणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात इलेक्ट्रिक वाहने विकत घेण्याकडे वाढता कल ...

More preference for two-wheelers in electric vehicles in the state | राज्यात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दुचाकीला अधिक पसंती

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दुचाकीला अधिक पसंती

Next

पाच वर्षांत ३८,२९३ वाहनांपैकी २७,९४६ दुचाकींची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात इलेक्ट्रिक वाहने विकत घेण्याकडे वाढता कल दिसून येत आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत राज्यात नोंदणी झालेल्या ३८,२९३ इलेक्ट्रिक वाहनांपैकी २७,९४६ दुचाकींची नोंदणी झाली, अशी माहिती मोटार वाहन विभागाने दिली. यावरून वाहनचालकांनी विजेवर धावणाऱ्या दुचाकीला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येते.

इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य शासन या धोरणाअंतर्गत वाहनधारकांसाठी रस्ता कर आणि नोंदणी शुल्कात सवलत देत आहे. १ एप्रिल २०१६ ते १३ जुलै २०२१ पर्यंत ३८,२९३ वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वांत जास्त म्हणजे २७,९४६ दुचाकींची नोंदणी झाली आहे. तर ४,५४७ तीन चाकी, २,५५३ चार चाकी आणि ३७१ मोठ्या वाहनांचा समावेश आहे.

सातत्याने वाढत जाणारी प्रदूषणाची पातळी आणि त्याहून वेगाने वाढणारे इंधन दर या पार्श्वभूमीवर राज्यात नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिसूचित करण्यात आले आहे. असे धोरण अधिसूचित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी वाहन खरेदी आणि नोंदणी शुल्कामध्ये सूट दिली जाणार आहे. याचा फायदा खरेदीदार ग्राहक आणि विक्रेता अशा दोघांनाही होणार आहे. त्यासोबतच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. त्यानुसार मुंबई आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा समावेश या धोरणात करण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक वाहने

दुचाकी २७,९४६

तीन चाकी ४,५४७

हलकी प्रवासी वाहने ५८५

कार २,५५३

मोठी प्रवासी वाहने ३७१

मध्यम प्रवासी वाहने २२८

हलकी मालवाहू वाहने २८

इतर वाहने २,०३५

एकूण वाहने ३८,२९३

Web Title: More preference for two-wheelers in electric vehicles in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.