मुंबई पूर्वपेक्षा पश्चिम उपनगरात अधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 03:17 AM2020-07-19T03:17:56+5:302020-07-19T03:18:00+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी शनिवारी पावसाने विश्रांती घेतली तरी तुरळक ठिकाणी पाऊस कोसळत होता.

More rain in western suburbs than east of Mumbai | मुंबई पूर्वपेक्षा पश्चिम उपनगरात अधिक पाऊस

मुंबई पूर्वपेक्षा पश्चिम उपनगरात अधिक पाऊस

Next

मुंबई : मुंबईत शनिवारी ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहर आणि पूर्व उपनगराच्या तुलनेत पश्चिम उपनगरात अधिक पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात ४३ तर शहर आणि पूर्व उपनगरात अनुक्रमे २६, ३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई शहरात १७ जुलैपर्यंत १ हजार १९१.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या वेळेत सर्वसाधारण ९१३.७ मिलीमीटर पावसाची नोंद होते. मात्र यावेळी सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत ३० टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला. मुंबईच्या उपनगरात १ हजार २२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वसाधारणरीत्या या काळात ९०७.३ मिमी पाऊस पडतो. मात्र पावसाचे प्रमाण वाढल्याने सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत हा पाऊस ३५ टक्के अधिक आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी शनिवारी पावसाने विश्रांती घेतली तरी तुरळक ठिकाणी पाऊस कोसळत होता. हे प्रमाण रोजच्या तुलनेत कमी होते. महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच दिवसांनी ठिकठिकाणी पावसाने मोकळीक घेतल्याने अनेक दिवसांनी मुंबईकरांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले. स. ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत एखादी सर कोसळत असतानाच बहुतांश ठिकाणी ऊनही पडले होते.
दरम्यान, पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पडझडीच्या घटना घडतच आहेत. मुंबईत शनिवारी ८ ठिकाणी झाडे
कोसळली, तर १२ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.

Web Title: More rain in western suburbs than east of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस