मुंबई : राज्यात रविवारी ४० हजार ७८१ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत राज्यात एकूण २ कोटी ७ लाख ९४ हजार ४३७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सात लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. रविवारपर्यंत एकूण ७ लाख ६ हजार ८५३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात मुंबई आघाडीवर असून आतापर्यंत ९३ हजार ५६४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्याखालोखाल, ठाणे ६८ हजार ११५, पुणे ५४ हजार ६९०, रत्नागिरीत २६ हजार ३५, रायगडमध्ये २५ हजार १९९, तर यवतमाळमध्ये २३ हजार ६११ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
राज्यात ११ लाख ५९ हजार १२५ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, ७ लाख १९ हजार ७६८ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १६ लाख ४९ हजार ७६६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ७ लाख ४७ हजार ३३९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांच्या लसीकरण प्रक्रियेत १ कोटी २८ लाख ८१ हजार २५७ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर २९ लाख ३० हजार ३२९ सामान्य नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.