परदेशी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना अधिक ताणतणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 02:51 AM2020-01-19T02:51:24+5:302020-01-19T02:51:49+5:30

कार्यालयात असताना कर्मचा-यांना मानसिक ताणतणावातून जावे लागते. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. ब-याचदा कर्मचा-यांना कामानिमित्त बाहेरगावी प्रवास करावा लागतो.

More stressful to foreign traveling servants | परदेशी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना अधिक ताणतणाव

परदेशी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना अधिक ताणतणाव

Next

मुंबई : मानसिक आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, आता कामकाजाच्या कामानिमित्त परदेशात प्रवास करताना कर्मचाऱ्यांमध्येही अनेक मानसिक आजार दिसून येत आहेत. नव्या वर्षात या रुग्णांची संख्या अधिक पटीने वाढू शकते, असे निरीक्षण विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी ग्लोबल ट्रॅव्हल्स रिस्क मॅनेजमेंटच्या आंतरराष्ट्रीय अहवालात मांडले आहे.

कार्यालयात असताना कर्मचा-यांना मानसिक ताणतणावातून जावे लागते. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. ब-याचदा कर्मचा-यांना कामानिमित्त बाहेरगावी प्रवास करावा लागतो. त्यामुळे या कर्मचा-यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात असल्याचा निष्कर्ष या अहवालातून समोर आला आहे. या अहवालाकरिता, जगभरातील कंपन्यांमधील कर्मचाºयांचे सर्वेक्षण करण्यात आले.

अहवालात संवाद साधताना प्रवास करणा-या कर्मचाºयांनी तणाव वाढत असल्याची बाब अधोरेखित केली. प्रवासात आरोग्यविषयक तक्रारी असल्याचे ४० टक्के कर्मचाºयांनी सांगितले आहे. ७३ टक्के जणांना झोपेचा अभाव, ७६ टक्के जणांनी जंक फूडचे सेवन आणि आहाराच्या अनिश्चित वेळा असण्याच्या तक्रारी केल्या आहेत. याखेरीज, विशेष लक्षणीय बाब म्हणजे, ४१ टक्के व्यक्तींनी प्रवास आणि काम यांचा समतोल साधताना नकारात्मक भावनांचा विळखा असल्याचे सांगितले.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अल्मेडा सौनिक म्हणाले,
आपल्याकडे शारीरिकआजारांवर प्राधान्याने उपचार केले जातात. मात्र, मानसिक समस्यांवर साधे जाहीर बोलले जात नाही, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे आता तरी याविषयी शासकीय व अन्य स्तरांवर मानसिक आजारांविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे.

Web Title: More stressful to foreign traveling servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.