मुंबईत १ लाख ९६ हजारांहून अधिक जागा उपलब्ध; अकरावी ऑनलाइन प्रवेशांना आजपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 10:24 AM2023-06-08T10:24:32+5:302023-06-08T10:24:53+5:30

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांना आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे.

more than 1 lakh 96 thousand seats available in mumbai 11th online admission starts from today | मुंबईत १ लाख ९६ हजारांहून अधिक जागा उपलब्ध; अकरावी ऑनलाइन प्रवेशांना आजपासून सुरुवात

मुंबईत १ लाख ९६ हजारांहून अधिक जागा उपलब्ध; अकरावी ऑनलाइन प्रवेशांना आजपासून सुरुवात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांना आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात १,०१७ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईत १ लाख ९६ हजारांहून अधिक जागा उपलब्ध असून सर्वाधिक जागा पश्चिम उपनगरांत - ९७ हजार ३५० - आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. 

कोटा अंतर्गत प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी आवश्यक असून ८ जून सकाळी १० वाजल्यापासून १२ जून रात्री १० वाजेपर्यंत विद्यार्थी कोटा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाचा भाग १ आणि भाग २ भरता येणार आहे. कोटा प्रवेशासाठी पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी म्हणजेच शून्य प्रवेश फेरी १३ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जाहीर होणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे https://mumbai.11thadmission.org.in संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी लॉगइन आयडी ऑनलाइन नोंदणी करून प्राप्त करून घ्यावा. त्यानंतरच या लॉगइन आयडीचा वापर करून अर्ज भरावयाचा आहे.

हे लक्षात असू द्या...

- १३ ते १५ जूनदरम्यान कोट्यांतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. 

- १६ ते १८ जूनदरम्यान कोटानिहाय रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार असून या जागा ऑनलाइन प्रवेशासाठी वळविण्यात येणार आहेत. 

- यादरम्यान विद्यार्थी कोटा प्रवेशासाठी यापूर्वी दिलेली पसंतीत बदल करू शकतात. 

- या विद्यार्थ्यांची निवड यादी १९ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल.

- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ जून या कालावधीत कॉलेजात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

विभाग            कनिष्ठ महाविद्यालय    कला    वाणिज्य    विज्ञान     एचएसव्हीसी     एकूण
दक्षिण मुंबई     ९८      ७५१०     २६३३०      १३२८०     ११३०      ४८९७० 
उत्तर मुंबई      १४८      ५०९०     २८५२०      १५५४०     १२०५      ५०३५५ 
पश्चिम मुंबई     २०४      ७१३०     ५९६७०      २९१६०     १३९०      ९७३५० 
ठाणे मनपा     ९८      ४९४०     १३८६०      ११५८०     ३०      ३०४१० 
कल्याण-डोंबिवली     ८५      ५२४०     १६७२०      १०८६०     ३३०      ३३१५० 
मीराभाईंदर मनपा     ३८      १४००     ६८४०      ३८००     ०     १२०४० 
नवी मुंबई मनपा     ६२      १४३०     १०४५०      ९७८०     ३००      २१९६० 
उल्हासनगर मनपा 
अंबरनाथ,बदलापूर नपा     ५८     २९२०     १०३८०      ५५४०     ०     १८८४० 
भिवंडी    ६६      ४७३०     ६२१०      ५३४०     २७०      १६५५० 
पनवेल    ५९      ३५२०     ६१२०      ६२४०     १५०      १६०३० 
वसई तालुका     १०८      ५४८०     १७१४०      ९८६०     २००      ३२६८० 
एकूण    १०१७      ४९३९०     २०२२४०      १२१५२०     ५००५     ३७८१५५

 

Web Title: more than 1 lakh 96 thousand seats available in mumbai 11th online admission starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.