मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या जुलै सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत ३१ जुलै २०२३ पर्यंत होती. ही प्रवेशाची मुदत १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत या सत्रात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात १२ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरूयूजीसीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या एमए मानसशास्त्र, एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमाचेही प्रवेश सुरू आहेत.
पदवीस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बी.ए., बी.कॉम, बी.कॉम. अकाउंट्स अँड फायनान्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्ष एम.ए. (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एम.ए. शिक्षणशास्त्र, एम.कॉम., एमएस्सी. गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून, प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे.
अभ्यासक्रमनिहाय आजपर्यंत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या- प्रथम वर्ष बी.ए. -२७७१- प्रथम वर्ष बी. कॉम.- ३६४४- प्रथम वर्ष बी.कॉम. अकाउंट्स अँड फायनान्स - २३२- प्रथम वर्ष बी.एस्सी. आयटी व कॉम्प्युटर सायन्स -३७०- प्रथम वर्ष एम.ए. -१६०२- प्रथम वर्ष एम.कॉम. -२४६०- प्रथम वर्ष एम.एस्सी. -४१२
विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन व अध्ययन साहित्य वितरणआयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्र असून, या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.