निवडणूक प्रशिक्षण शिबिरात १५० पेक्षा अधिक शिक्षक झाले सहभागी
By मनोहर कुंभेजकर | Published: April 24, 2024 12:08 PM2024-04-24T12:08:14+5:302024-04-24T12:08:48+5:30
Mumbai News: मुंबई उच्च न्यायालयाच्या दि.16/04/2024 च्या आदेशाचा सन्मान करीत दहिसर(पश्चिम ) येथील रुस्तुमजी शैक्षणिक संस्थेअंतर्गत येणाऱ्या विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला प्रतिसाद देत दि.21/04/2024 रोजी या शैक्षणिक संस्थेत विनाअनुदानित शिक्षकांचे निवडणूक प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - निवडणूक कर्तव्य म्हटलं म्हणजे बहुधा शाळा चालकांसह शिक्षक आणि इतर कर्मचारी ती कशी टाळता येईल याचाच विचार आणि कारणे शोधतात. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या दि.16/04/2024 च्या आदेशाचा सन्मान करीत दहिसर(पश्चिम ) येथील रुस्तुमजी शैक्षणिक संस्थेअंतर्गत येणाऱ्या विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला प्रतिसाद देत दि.21/04/2024 रोजी या शैक्षणिक संस्थेत विनाअनुदानित शिक्षकांचे निवडणूक प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
२६ - मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघांतर्गत १५३ दहिसर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक कर्तव्य आदेशास संस्थेच्या विश्वस्त व प्रशासनासह शिक्षक व कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शाळेच्या आवारात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष इतर मतदान अधिकारी पदांच्या कर्तव्यसंदर्भातील प्रशिक्षणास 150 पेक्षा अधिक संख्येने उपस्थित राहून विना अनुदानित शाळांपुढे एक नवा आदर्श घालून दिला.
याकामी संस्थेच्या विश्वस्त मंडळासह प्राचार्यांनी पुढाकार घेऊन आपल्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यसाठी व्हाट्स ग्रुपवर तातडीची बैठक घेऊन त्यांना हे आदेश स्वीकारण्यासाठी उद्युक्त केले हि बाब विशेष महत्वाची व प्रशंसनीय आहे.