Join us

मुंबई : मंडाले मेट्रो डेपोचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण

By सचिन लुंगसे | Published: December 28, 2022 12:23 PM

मुंबई मेट्रो मार्ग २ब साठी मंडाळे येथे ३० हेक्टर जागेत मेट्रो कार डेपो उभारत असून यामध्ये प्रामुख्याने सरकारी जमिनीचा समावेश आहे.

मुंबई : एमएमआरडीए डी.एन.नगर ते मंडाळे या २३.६४ किमी लांबीच्या मुंबईमेट्रो मार्ग २ब साठी मंडाळे येथे ३० हेक्टर जागेत मेट्रो कार डेपो उभारत असून यामध्ये प्रामुख्याने सरकारी जमिनीचा समावेश आहे.  सदर डेपोची एकूण ५४% स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. मंडाळे डेपोमध्ये ७२ स्थिर मार्गिका असतील तसेच स्टेबलिंग यार्ड (Stabling Yard), हाजार्ड स्टोर इमारत  हेवी वॉश प्लांट, भूमिगत टाकी, डीसीसी प्रशासकीय इमारत, सेंट्रल स्टोअर इमारत, वर्कशॉप, तपासणी इमारत, सी.एम.व्ही.  इमारत, रिसीव्हिंग सबस्टेशन (RSS), टेस्ट ट्रॅक, ईटीपी (ETP) आणि एसटीपी (STP) कंपाउंड वॉल, सिक्युरिटी वॉच टॉवर इ. सुविधांचा चा समावेश आहे.

एमएमआरडीएने मंडाले डेपोत उभारली धूळ शमन यंत्रणा उभारली आहे. एमएमआरडीएची टीम पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून मंडाले डेपो मध्ये धूळ उत्सर्जन नियंत्रणासाठी उपाय योजना आखली आहे. जसे की साईटवर वेळोवेळी पाणी शिंपडणे, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी डिझाइन केलेली यंत्रसामग्री आणि उपकरणे वापरणे, उत्खनन सामग्री घेऊन जाणारी वाहने ताडपत्रीने झाकून ठेवणे, धूळ उत्सर्जन कमी होईल अशा प्रकारे रचलेले उत्खनन साहित्य वापरणे, सर्व उत्खनन केलेल्या साहित्याची नियमितपणे नियुक्त केलेल्या ठिकाणी विल्हेवाट लावणे यासारख्या धूळ नियंत्रण करण्याच्या दृष्टीने विविध गोष्टींचा अवलंब करत असल्यामुळे मंडाळे डेपोच्या परिसरात हवेची आणि आवाजाची गुणवत्ता पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानक मर्यादेत नोंदवली गेली आहे. 

मंडाले डेपोचे बांधकाम करताना आम्ही अत्यंत काळजी घेत आहोत, तसेच सर्व आवश्यक निकषांचे पालन करत आहोत. आमची टीम वेळोवेळी सक्षम उपाय योजना राबवते. लवकरच संरचनात्मक कामे पूर्ण करून प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे उद्दिष्ट आहे, असे एमएमआरडीएचे मा. महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, भा.प्र.से. म्हणाले.

टॅग्स :मुंबईमेट्रो