गोसालियांच्या अल्पोपहाराने भारावले सुमारे ५०००० हून अधिक रिक्षा चालक

By मनोहर कुंभेजकर | Published: August 26, 2023 11:42 AM2023-08-26T11:42:02+5:302023-08-26T11:43:50+5:30

आजमितीस त्यांनी सुमारे ५०००० हून अधिक रिक्षावाल्यांना त्यांनी अल्पोपहार दिला आहे.

more than 50000 rickshaw pullers were overwhelmed by former congress mla gosalia refreshments | गोसालियांच्या अल्पोपहाराने भारावले सुमारे ५०००० हून अधिक रिक्षा चालक

गोसालियांच्या अल्पोपहाराने भारावले सुमारे ५०००० हून अधिक रिक्षा चालक

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, मुंबई-मुंबई पश्चिम व पूर्व उपनगरात वांद्रे ते दहिसर चेक नाका आणि सायन ते मुलुंड चेक नाका या दरम्यान धावणाऱ्या सुमारे दोन लाख साठ हजार रिक्षा आहेत.रिक्षा चालक मुंबईकरांना २४ तास सेवा देत असतात.तर हे रिक्षा चालक १२ तासांच्या दोन शिफ्ट मध्ये रिक्षा चालवतात. अनेक रिक्षा चालक मालकांकडून भाडे तत्वावर रिक्षा चालवण्यासाठी घेतात आणि एक ठराविक रक्कम देत दिवसभर कष्ट करत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी खाण्याकडे दुर्लक्ष करत रिक्षा चालवत मुंबईकरांना सेवा देतात.

सामाजिक बांधिलकी जपत काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत गोसालिया आणि त्यांचे सुपुत्र आशिष गोसालिया हे रोज सकाळ ९ पासून ते रात्री ९ पर्यंत पश्चिम व पूर्व उपनगर,मीरा-भाईंदर, वसई-विरार,नवी मुंबई व ठाणे येथून रोज येणाऱ्या सुमारे ५०० ते ६०० रिक्षा चालकांना आपल्या राहत्या घरी अल्पोपहार देतात. आजमितीस त्यांनी सुमारे ५०००० हून अधिक रिक्षावाल्यांना त्यांनी अल्पोपहार दिला आहे.

मालाड (पश्चिम) लिंक रोड ,एव्हरशाईन नगर,मुंबई येथील गोसालियांच्या बंगल्यावर गेल्या चार महिन्यांपासून रोज अल्पोपहारासाठी रिक्षावाले येत असून त्यांना बिस्कीटचा पुडा, पाण्याची बाटली,चिप्स,वेफर्स,चॉकलेट,फ्रूटी आणि लस्सी अशी शिदोरी देतात. विशेष म्हणजे रोज रिक्षा चालक आम्हाला आपल्या बंगल्यावर अल्पोपहार मिळाल्याचे आवर्जून फोन करून सांगतात असे चंद्रकांत गोसालिया व आशिष गोसालिया यांनी सांगितले.

काँग्रेसचे निष्ठावान असलेले चंद्रकांत गोसालिया हे १९८५ ते १९९५ पर्यंत कांदिवलीतून आमदार होते.त्यांनी दोन वेळा कांदिवलीचे आमदार म्हणून मालाड-कांदिवलीत अनेक विकासाची कामे करून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यानंतर त्यांनी उत्तर मुंबईत खासदारकीची निवडणूक देखिल लढवली होती.तर बांधकाम क्षेत्रात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे आशिष गोसालिया हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी सेलचे अध्यक्ष व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे ते सचिव देखील होते. 

चंद्रकांत गोसलिया आणि आशिष गोसालिया हे  मुंबई आणि शेजारच्या उपनगरी भागातील रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, नोंदणी कार्यालये, धार्मिक स्थळे आणि विविध उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी सुमारे १२०० हून अधिक बेंचेस लावून त्यांनी नागरिकांची बसण्याची व्यवस्था केली असून नागरिकांची सेवा करण्याचे त्यांचे कार्य निरंतर सुरू आहे.

गरजूंना भेटवस्तू, पुस्तके, स्टेशनरी, अन्नधान्य किट,तसेच कॅन्सरग्रस्त व गरजू रुग्णांना नेहमी आर्थिक मदतीचा हात दिला आहे असे आशिष गोसालिया म्हणाले. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सुमारे २५००० नागरिकांना करमणुकीचा मनमुराद आनंद मिळण्यासाठी त्यांनी मार्च २०२२ ते जून २०२२ या काळात पश्चिम उपनगरातील विविध चित्रपटगृहांमध्ये मराठी,हिंदी,गुजराती आदी विविध भाषेतील चित्रपट मोफत दाखवले.तर कोविड मध्ये देखिल सुमारे ५०००० हून अधिक गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचे  वाटप केले अशी माहिती चंद्रकांत गोसालिया यांनी दिली.यापूर्वी त्यांनी हेल्पलाईन देखिल सुरू केली होती.ज्याद्वारे जेष्ठ नागरिकांना कार्ड आणि मतदार ओळखपत्र देण्यासाठी हजारो नागरिकांची नोंदणी केली होती.

आपल्याला या समाजाने जो मान सन्मान दिला त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करीत ते म्हणतात की,ही सामाजिक  बांधिलकी जपण्यासाठी आमची जनसेवा  यापुढे  निरंतर सुरू राहील.
 

Web Title: more than 50000 rickshaw pullers were overwhelmed by former congress mla gosalia refreshments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.