Join us

निम्म्याहून जास्त पगार घराचे भाडे भरण्यात जातो; स्वप्नातले घर साकारण्यासाठी करावी लागतेय कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 7:31 AM

मुंबई शहर आणि उपनगरातील पायाभूत सेवा, सुविधा बळकट होत असून, वेगाने धावणारी मेट्रो शहराला बूस्ट देत आहे.

मुंबई :

मुंबई शहर आणि उपनगरातील पायाभूत सेवा, सुविधा बळकट होत असून, वेगाने धावणारी मेट्रो शहराला बूस्ट देत आहे. याव्यतिरिक्त रेल्वेस्थानकांपासून बसस्थानका पर्यंतच्या सर्वच सेवा सुविधांना बळकटी मिळत असल्याने मुंबईतील घरांचे, भाड्याच्या घरांचे दर अव्वाच्या सव्वा झाले असून, घराचे हप्ते फेडण्यातच मुंबईकरांचा निम्म्यावर पगार जात असल्याचे चित्र आहे. विशेषत: दक्षिण मुंबई, दादर, माहीम, मुलुंड, विलेपार्ले, अंधेरीसह जोगेश्वरी आणि बोरीवली येथील घरांच्या किमती सातत्याने उसळी घेत असल्याने स्वप्नातले घर प्रत्यक्षात उतरविण्यासाठी चाकरमान्यांना कसरत करावी लागत आहे.

नवी मुंबईतील खारघर अहमदाबादमधील चांदखेडा, पुण्यातील वाकड, नवी मुंबईतील खारघर, अहमदाबादमधील गोटा आणि अहमदाबादमधील वस्त्राल यांनाही पसंती आहे.

चाळीही महागमध्य मुंबईत कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द, करीरोड, चिंचपोकळी, मरोळ, बोरीवली, भांडुप अशा काही परिसरांत चाळीतल्या घरांचे भाडेही आजच्याघडीला १० हजार रुपयांच्या घरात आहे.

मुंबईमधील मीरा रोडनिवासी मालमत्तांसाठी शोधाच्या संदर्भात ठाणे पश्चिम नंतर बंगळुरुमधील व्हाइटफिल्ड आणि दिल्ली-एनसीआरमधील नोएडा एक्स्टेन्शन यांचा क्रमांक लागतो. तर कोलकातामधील न्यू टाऊन आणि मुंबईमधील मीरा रोड पूर्व या भागांना पसंती आहे.

ऑनलाइन शोध२०२२ मध्ये भाड्याच्या घरांसाठी ऑनलाइन मालमत्ता शोधांमध्ये १.५ पट वाढ झाली. २०२२ मध्ये बंगळुरू, मुंबई व हैद्राबाद येथे भाड्याच्या घरांचा शोध मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला. यासाठीची चौकशीही मोठी प्रमाणात करण्यात आली.

दक्षिण मुंबई महागनेपियन्सी रोड, पेडर रोड, मलबार हिल, वरळी या दक्षिण मुंबईसह दक्षिण मध्य मुंबईतल्या ठिकाणी घरांच्या किमती कोट्यवधींच्या घरात असून, घरांचे भाडे हजारोंपासून लाखोंच्या घरात आहेत.

आकडे काय म्हणतातराज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मार्च २०२३ मध्ये मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या नोंदणीत घट झाली आहे. एकूण १२ हजार ५७४ मालमत्तांची नोंदणी झाली. गेल्यावर्षी मार्चमध्ये १६ हजार ७२६ मालमत्तांची नोंदणी झाली होती.ठाणे आणि मीरा रोड    नवीन घर खरेदी करण्यासाठी गृह खरेदीदारांची ठाणे पश्चिम विभागाला सर्वाधिक पसंती असल्याचे हाैसिंग डॉट कॉमवरील प्रॉपर्टी शोधातून निदर्शनास आले आहे.     घर खरेदीसाठी ग्राहकांची ठाणे पश्चिम, मीरा रोड पूर्वला सर्वाधिक पसंती आहे. १ ते २ कोटी रूपयांदरम्यानच्या घरांना ग्राहकांची वाढती मागणी आहे.