११ विभागांमध्ये कोरोनाचे एक हजारहून अधिक रुग्ण; आतापर्यंत ३३ हजारांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 02:31 AM2020-05-29T02:31:43+5:302020-05-29T06:31:41+5:30
दोन दिवसांत ४० हजार होतील
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मुंबईतील तब्बल ११ विभागांमध्ये अद्यापही एक हजाराहून अधिक असल्याचे समोर आले आहे. तर बोरीवली, मालाड, भांडुप, घाटकोपर या चार विभागांमध्ये दररोज रुग्ण वाढण्याची संख्या सरासरी आठ ते नऊ टक्के आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या धरावी आणि वरळी या विभागांमध्ये आता रुग्ण वाढण्याची संख्या सर्वांत कमी ३.१ टक्के असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत आतापर्यंत ३३ हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
३१ मेपर्यंत रुग्णांची संख्या ४० हजारांहून अधिक असेल, असा अंदाज केंद्राच्या पथकाने वर्तवला होता. मात्र महापालिकेने गेल्या महिन्याभरात केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील अॅक्टिव रुग्णांची संख्या सद्य:स्थितीत २२ हजार असल्याचा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. मात्र अद्यापही धारावी, भायखळा, सायन, वडाळा, कुर्ला, वांद्रा, अंधेरी, विलेपार्ले, वरळी, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, गोवंडी, परळ, घाटकोपर या विभागांमध्ये रुग्णांची संख्या एक हजाराहून अधिक आहे. आतापर्यंत ९,०५४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वरळी विभागात सर्वाधिक म्हणजे ८३३ एवढे आहे.
एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या सात दिवसांमध्ये दुप्पट होत होती. यामुळे मे महिन्याच्या अखेरपर्यंत रुग्णांची संख्या ४० हजार अधिक असेल, असा अंदाज केंद्राने व्यक्त केला होता. त्यामुळे महापालिकेने आठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण दहा दिवसांवरून २० दिवसांवर नेण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यानुसार मे महिन्याच्या पंधरवड्यात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १४ दिवसांवर आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
विभाग आतापर्यंत रुग्ण डस्चार्ज
जी उत्तर (धारावी, प्रभादेवी) २७२८ ६१७
भायखळा, नागपाडा २४३८ ८०३एफ उत्तर
माटुंगा, सायन, वडाळा २३७७ ६७७
एल कुर्ला २३२१ ५१०
एच पूर्व वांद्रे पूर्व, खार २०९४ ६१५
के पश्चिम अंधेरी पश्चिम २०४९ ६७४
जी दक्षिण वरळी, प्रभादेवी १९०५ ८३३
के पूर्व अंधेरी पूर्व, जोगेश्वरी १८७५ ५८३
एम पूर्व देवनार, गोवंडी १६९६ ४३५
एफ दक्षिण परळ १६४८ ३९६
एन घाटकोपर १५२५ ३००