वीस हजारांहून अधिक रिक्षाचालकांनी बसवले अद्ययावत मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:06 AM2021-03-17T04:06:48+5:302021-03-17T04:06:48+5:30
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने नुकतीच टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाड्यात ३ रुपयांची वाढ केली होती. त्याची अंमलबजावणी ...
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने नुकतीच टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाड्यात ३ रुपयांची वाढ केली होती. त्याची अंमलबजावणी १ मार्चपासून करण्यात येत आहे. मुंबईत सोमवारपर्यंत २०,५०० रिक्षामीटरचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात ४.६ रिक्षा आणि ६० हजार टॅक्सी आहेत. मीटर अद्ययावत करण्यासाठी प्रत्येकी ७०० रुपयांचा खर्च येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सींसाठी मीटर अद्ययावत करण्यासाठी एक वेळापत्रक तयार केले आहे. प्रत्येक आठवड्याला एका क्रमांकाचे वाहन असेल. ज्या वाहनांचा नोंदणी क्रमांक ० मध्ये संपते ती वाहने सर्वप्रथम १ ते ७ मार्चदरम्यान अद्ययावत करण्यासाठी येतील. त्यानंतर १ क्रमांक असणारी वाहने ८ ते १४ मार्च आणि २ क्रमांक असणारी वाहने १५ ते २१ मार्च रोजी केली जाणार आहेत. ३ ते ९ मे या शेवटच्या अंकापर्यंत ‘९’ अशी वाहने असतील. मे महिन्यात उर्वरित वेळ ज्या चालकांना
मीटर अद्ययावत करता आले नाही त्यांच्यासाठी असणार आहे.