Join us

राज्यातील कोरोनाचा मृत्युदर २.७ पर्यंत घसरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 6:24 AM

कोरोना बरे होण्याचे प्रमाण 76.9 टक्के

अकोला : राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असला, तरी सप्टेंबर अखेरपर्यंत मृत्युदर २.७ टक्क्यांवर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय, बरे होण्याचे प्रमाणही ७६.९ टक्क्यांवर पोहोचले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्याचा मृत्युदर २.७ टक्क्यांवर आल्याने दिलासा मिळाला आहे. एप्रिलमध्ये हाच मृत्युदर १२ एप्रिलला ७.५% झाला होता. मेपर्यंत मृत्युदर ४ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर तो कमी झाला.महापालिकासर्वाधिक मृत्यूमुंबई ८,७५०पुणे ३,४३७नागपूर १,६५५ठाणे १,०८३पिंपरी चिंचवड १,००७सर्वात कमी मृत्यूचंद्रपूर ४८परभणी ९७अकोला १३५मालेगाव १३९अमरावती १४८महाराष्ट्र आरोग्य विभागाने२७ सप्टेंबरला सकाळी १0.३0 वा. दिलेली आकडेवारी 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या