मुंबई- मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला दहशतवादी हल्लाआजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. या हल्ल्याच्या खुणा आजही पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज, हॉटेल ट्रायडंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, मेट्रो सिनेमा अशा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला.
2008 मधील दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार मोशे होल्ट्जबर्ग जवळपास दहा वर्षांनी मुंबईत परतला आहे. मोशे मंगळवारी सकाळी इस्त्रायलहून मुंबई एअरपोर्टवर पोहचला. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्या शिष्टमंडळासह तो भारतात आला आहे.२६/११ दहशतवादी हल्ल्यातून वाचलेला बेबी मोशे आपल्या आजी आजोंबासोबत भारतात दाखल झाला आहे. मोशे नेतान्याहू यांच्यासमवेत छाबड हाऊसला भेट देणार आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी छाबड हाऊसवरदेखील हल्ला केला होता. या हल्ल्यात मोशेचे आई- वडील मारले गेले होते, तेव्हा मोशे दोन वर्षांचा होता. त्यानंतर संगोपनासाठी त्याच्या आजी आजोबांनी त्याला इस्रायला नेलं होतं. मोशे या घटनेनंतर दुसऱ्यांदा भारतात आला आहे
हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, मोशे मुंबईत परत येऊ शकला यासाठी मी देवाचे आभार मानतो. मुंबई हे आता खूपच सुरक्षित शहर आहे’ अशी प्रतिक्रिया मोशेच्या आजोबांनी दिली आहे. मोशे आता अकरा वर्षांचा झाला आहे. ज्या ठिकाणी मोशेच्या आईनं त्याचं शेवटचं चुंबन घेतलं होतं. ज्या ठिकाणी त्याचे वडिल शेवटचे हसले होते त्याच घरात मोशे आता परतणार आहे अशी भाविनिक प्रतिक्रिया रबई कोझलोव्स्कीनं दिली आहे. मुंबई दौऱ्याात मोशे ताज आणि गेटवे ऑफ इंडियालादेखील भेट देणार आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मोशेने त्यांच्या आई-वडिलांना गमावलं. त्या हल्ल्यानंतर मोशे इस्रायलच्या अफुला शहरात त्याच्या आजीआजोबांसोबत राहतो. मोशे आता पुन्हा मुंबईत आला आहे. मुंबईत राहून मोशेला त्याच शिक्षण पूर्ण करायचं आहे यासाठी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मोशे दोन वर्षांचा होता. नरीमन हाऊस आणि ताज हॉटेलसह इतर ठिकाणी झालेल्या हल्ल्यात एकुण 166 नागरिकांचा जीव गेला. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी छाबड हाऊला देखील लक्ष्य केलं होतं. त्यावेळी छाबड हाऊमध्ये मोशे, त्याचे आई वडिल आणि आया राहत होती. दहशतवादी हल्ल्यात मोशेचे आई-वडिल मारले गेले, पण दोन वर्षांचा मोशे वाचला. मोशेला सांभाळणारी त्याची आया तळघरात त्याला घेऊन लपली होती. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्यात हे दोघंही सुरक्षित वाचले. त्यानंतर मोशेला इस्रायलमध्ये संगोपनासाठी नेण्यात आलं होतं.