कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक बाधित; दिवसभरात आढळले ४०९ कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 03:20 AM2021-03-14T03:20:05+5:302021-03-14T03:20:39+5:30

उल्हासनगरमध्ये ३५ रुग्ण सापडले असून, एकाचाही मृत्यू झालेला नाही. येथील एकूण बाधितांची संख्या १२ हजार १४१, तर मृतांची संख्या ३७३ वर गेली आहे.

Most affected in Kalyan-Dombivali; 409 corona patients were found during the day | कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक बाधित; दिवसभरात आढळले ४०९ कोरोना रुग्ण

कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक बाधित; दिवसभरात आढळले ४०९ कोरोना रुग्ण

Next

ठाणे/मुंबई :ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंतची रुग्णसंख्या दोन लाख ७५ हजार ४५२ वर पोहोचली आहे,  शनिवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने वर्षभरातील मृतांची संख्या सहा हजार ३३२ झाली. ठाणे शहरात ३३८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६५ हजार २१६ झाली आहे. शहरात दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४१२ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत ४०९ रुग्णांची वाढ झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ६६ हजार ५५३ रुग्णबाधित असून, एक हजार २११ मृतांची नोंद झाली आहे, तर नवी मुंबई शहरातही दोघांचा मृत्यू झाला आहे. (Most affected in Kalyan-Dombivali; 409 corona patients were found during the day)

उल्हासनगरमध्ये ३५ रुग्ण सापडले असून, एकाचाही मृत्यू झालेला नाही. येथील एकूण बाधितांची संख्या १२ हजार १४१, तर मृतांची संख्या ३७३ वर गेली आहे. भिवंडीत १४ नवीन बाधितांची नोंद झाल्याने एकूण रुग्णसंख्या सहा हजार ९२० झाली आहे, तर मृतांची संख्या ३५६ आहे. मीरा-भाईंदरमध्ये ५७ रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही.  या शहरात बाधितांची संख्या २७ हजार ८५४ असून, मृतांची संख्या ८०६ आहे. अंबरनाथमध्ये ३४ रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. येथे बाधित नऊ हजार १२२ असून, मृत्यू ३१६ आहेत. बदलापूरमध्ये ४३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या १० हजार ४४९ वर गेली आहे. या शहरात एकही मृत्यू नसल्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या १२३ आहे. ग्रामीणमध्ये ६४ रुग्णांची वाढ झाली असून, एकही मृत्यू नाही. आतापर्यंचे बाधित रुग्ण १९ हजार ८६१ असून, एकूण ५९८ मृत्यू झाले आहेत.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर
- मुंबईत दिवसभरात ९४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ३ लाख १६ हजार ३२० रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९२ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत ३५ लाख ३७ हजार ६६४ चाचण्या झाल्या आहेत.

- मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ३१ असून, सक्रिय सीलबंद इमारती २२० आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १२ हजार चार अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.

सर्वाधिक मृत्यू ६० ते ६९ या वयाेगटातील
मुंबईत झालेल्या ११ हजार ५१९ रुग्णांच्या मृत्युपैकी ५० ते ५९ वयोगटांतील २ हजार ४९४, ६० ते ६९ वयाेगटातील ३ हजार ३०२, ७० ते ७९ वयाेगटातील २ हजार ७७२, ८० ते ८९ वयाेगटातील १ हजार २८४, तर ४० ते ४९ या वयाेगटातील १ हजार ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Most affected in Kalyan-Dombivali; 409 corona patients were found during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.