Join us

अल्पवयीन मुलींवर नातेवाइकांकड़ूनच सर्वाधिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:10 AM

मुंबई : मुंबईसारख्या मेट्रोसिटीतही महिला असुरक्षित असल्याचे पोलीस दफ्तरी नोंद होत असलेल्या आकडेवारीतून समोर येत आहे. गेल्या ...

मुंबई : मुंबईसारख्या मेट्रोसिटीतही महिला असुरक्षित असल्याचे पोलीस दफ्तरी नोंद होत असलेल्या आकडेवारीतून समोर येत आहे. गेल्या वर्षभरात ४४५ अल्पवयीन मुली विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. यात सर्वाधिक अत्याचार जवळच्या व्यक्तीकडून झाले आहेत.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचाराच्या ४ हजार ५३९ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी ३ हजार ५०७ गुह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. २०२९ मध्ये वर्षी ६ हजार ४३८ गुह्यांची नोंद पोलीस दफ्तरी झाली. तर ५ हजार ३२८ गुह्यांची उकल करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात महिलांवरील अत्याचार, चोरी, घरफोडी, हत्या, दारोडा, खंडणी यांसारख्या गंभीर गुह्यांचे प्रमाण घटले होते.

लॉकडाऊनचे सुरुवातीचे काही दिवस सोडले तर, मुख्यत्वे करून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. शहरात दिवसाला दाखल होणाऱ्या बलात्काराच्या सरासरी तीन गुह्यांचे प्रमाण घटून दर दोन दिवसात एका गुह्यावर आले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अर्ध्यावर असला, तरी जूननंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ स्वरूपात आली. यात, गेल्या वर्षभरात ४४५ मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. त्यापैकी ४१९ गुह्यांची उकल करण्यात आली आहे. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी ४२ घटना घडल्या असून, त्यापैकी ३६ गुह्यांचा उलगडा करण्यात आला आहे.

.....

जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंतची आकडेवारी...

गुन्हे २०२१ २०२० २०१९

बलात्कार ४२/ ३६ ४४५ / ४१९ ६२२/ ५९६

.......

मुंबईतला दोषसिद्धी दर ३० टक्क्यांवर

एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील घेतलेल्या गुन्हेगारीच्या आढाव्यात, २०२९ च्या आकडेवारीनुसार, महिलांविरोधी गुन्ह्यांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर(१२ हजार ९०२) तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर (६ हजार ५१९) आहे. नागपूर शहरात ११४४ गुन्हे नोंद झाले आहेत. असे असले तरी नागपुराचे गुन्हे प्रमाण मुंबईपेक्षा जास्त आहे, तसेच नागपूर शहरात महिलांविरोधी गुन्ह्यांशी संबंधित ९६ टक्के खटले प्रलंबित असून, दोषसिद्धी दर १० टक्क्यांहून कमी आहे. मुंबईतला दोषसिद्धी दर ३० टक्क्यांवर आहे.

.....